22 January 2021

News Flash

इस्रायलकडून वरुण धवनच्या टि्वटची दखल, लसीच्या शोधाचं थेट ABCD 2 शी जोडलं कनेक्शन

सर्वसामान्यांप्रमाणे वरुण धवनही करोना व्हायरसशी संबंधित महत्वाच्या बातम्यांची आवर्जून दखल घेत आहे.

लॉकडाउनमुळे बॉलिवूडचे सर्व कलाकार सध्या घरीच असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सक्रीय आहेत. बॉलिवूडचा स्टार वरुण धवन अशाच कलाकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यांप्रमाणे वरुण धवनही करोना व्हायरसशी संबंधित महत्वाच्या बातम्यांची आवर्जून दखल घेत आहे. वरुणच्या टि्वटची खुद्द इस्रायलच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन दखल घेण्यात आली आहे.

नेमकं काय झालं ?
इस्रायली वैज्ञानिक करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका इस्रायली पत्रकाराने टि्वट केले होते. “करोना व्हायरसवर अ‍ॅंटीडोटचा महत्वाचा शोध लागला आहे. हे अ‍ॅंटीडोट आजारी रुग्णाच्या शरीरात करोना व्हायरसवर हल्ला करुन त्याचा खात्मा करतात” असे टि्वट अमीचाय स्टीन या पत्रकाराने केले होते.

वरुण धवनने ते टि्वट रिटि्वट करताना ‘हे खरं होवो’ असा संदेश लिहिला. इस्रायली दूतावासातील एका अधिकाऱ्याने वरुण धवनच्या या टि्वटची दखल घेतली. “हो, वरुण धवन हे खरं आहे. ही लस व्यावसायिक वापरात येण्याआधी अजून काही टप्पे पार करावे लागतील. भारतातील आम्ही आमच्या मित्रांना याची माहिती देत राहू. करोना व्हायरसविरोधात मिळून एकत्र लढू. सुरक्षित राहा” असे या अधिकाऱ्याने आपल्या टि्वटमध्ये होते. त्यावर वरुणने त्यांचे आभार मानले.

त्यानंतर इस्रायलच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन वरुणच्या चित्रपटातील डायलॉग टि्वट करुन प्रतिसाद देण्यात आला. २०१५ साली आलेल्या ABCD 2 या चित्रपटातील एक डायलॉग टि्वट करण्यात आला. सही दिशा में उठा हर कदम … अपने आप में एक मंज़िल है… आखिर ज़िन्दगी का मतलब ही अपना अगला कदम चुनना है। असे त्या टि्वटमध्ये म्हटले होते.

त्यावर वरुणने प्रेम आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन डायलॉग इस्रायलपर्यंत पोहोचला त्याचा आनंद आहे असे टि्वट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 4:44 pm

Web Title: israel official twitter handle tweet varun dhawan abcd 2 movie dialogue dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 अरबाजसोबत लग्न कधी करणार?; जॉर्जिया म्हणाली…
2 सागर कारंडेशी थेट संवाद साधण्याची संधी
3 ‘लवकरच महायुद्ध होण्याची शक्यता आहे…’ अभिनेत्याने खळबळजनक ट्विट
Just Now!
X