News Flash

भांडी धुण्यासाठी सलमानला मिळाले ६०० कोटी; स्पर्धकाचा दावा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

वादविवाद आणि ‘अनलिमिडेट ड्रामा’साठी ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो ओळखला जातो. यंदाचा सिझन गाजवण्यासाठी, पब्लिसिटीसाठी बरेच प्रयत्न निर्मात्यांकडून केले गेले. मग ते स्पर्धकांना दिलेले चित्रविचित्र टास्क असो किंवा मग खुद्द सलमानने बिग बॉसच्या घरात जाऊन केलेली धुणीभांडी असो.. सोशल मीडियावर बिग बॉसचा तेरावा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमधून नुकतीच हिमांशी खुराना बाहेर पडली. हिमांशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण या व्हिडीओत तिने सलमानविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

या व्हिडीओत हिमांशी नखं कापताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात काम करुन नखांचे सौंदर्य गेल्याचं ती या व्हिडीओत म्हणते. तेवढ्यात तिची एक मैत्रीण तिला विचारते की सलमाननेसुद्धा बिग बॉसच्या घरात येऊन भांडी घासली. त्यावर हिमांशी म्हणते, त्याला त्या कामासाठी तब्बल ६०० कोटी रुपये देण्यात आले होते.

हिमांशीने केलेल्या या वक्तव्यात किती तथ्य आहे हे तर सलमानच सांगू शकतो. पण ‘बिग बॉस १३’ने सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.

आणखी वाचा : सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांवर करीनाचं मजेशीर उत्तर

शहनाज गिलला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी साफसफाई आणि घरातील काम करण्यास नकार दिला होता. याच गोष्टीचा सलमानला राग आला आणि त्याने चक्क ‘बिग बॉस’च्या घरी जाऊन भांडी घासली आणि टॉयलेटसुद्धा साफ केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 12:41 pm

Web Title: it was salman job to clean house junk as he gets rs 600 cr says himanshi khurana ssv 92
Next Stories
1 ‘शोर युँही ना परींदो ने मचाया होगा…’ हेमंत ढोमेचा मोदी सरकारवर निशाणा
2 “तू फक्त कपडे घाल आणि ये…”; रोहित शेट्टी कतरिना कैफवर संतापला
3 Happy Birthday Sagarika Ghatge : झहीर-सागरिकाची ‘लव्ह स्टोरी’ माहितीये का?
Just Now!
X