16 November 2018

News Flash

ITA Awards 2017 red carpet PHOTO: टेलिव्हिजनवरील ‘बहूं’चा ग्लॅमरस अंदाज

या संपूर्ण सोहळ्यात अभिनेत्री रश्मी देसाईवर सर्वाधिक नजरा खिळल्या.

इंडियन टेलिव्हिनज अकॅडमी अवॉर्ड

कलाविश्वात समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पसंतीची पोचपावती खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच दरवर्षी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांचे कौतुक करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘इंडियन टेलिव्हिनज अकॅडमी अवॉर्ड’(आयटा अवॉर्ड). टेलिव्हिजन विश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. एरवी मालिकांमध्ये साडी आणि पंजाबी ड्रेस अशा पारंपारिक पेहरावात ‘संस्कारी बहूं’च्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री यावेळी ग्लॅमरस लूकमध्ये पाहावयास मिळाल्या.

वाचा : रणबीर-माहिराच्या व्हायरल फोटोंबद्दल रणवीर म्हणतो..

१७व्या आयटा पुरस्कार सोहळ्यात टेलिव्हिजन सेलिब्रिटींची मांदियाळी पाहावयास मिळाली. जेनिफर विंगेट, कांची सिंग, किश्वर मर्चंट यांसह अनेक अभिनेत्रींनचे रेड कार्पेटवरील ग्लॅमरस रूप पाहण्यासारखे होते. ‘बेहद’ मालिका फेम अभिनेत्री जेनिफरने हाय स्लिट गाऊन घातला होता. तिने आपला हा लूक पूर्ण करण्यासाठी गडद रंगाची लिपस्टिक लावली होती. तर कांची सिंग ही तिचा ‘रिश्ता क्या कहलाता है’ मधील सहकलाकार रोहन मेहरा याच्यासह रेड कार्पेटवर झळकली. दरम्यान, लाल रंगाचा गाऊन घातलेल्या किश्वरच्या चेहऱ्यावरील मधुर हास्याने अनेकांना घायाळ केले.

वाचा : ‘फॅनी खान’च्या सेटवर अपघात

या संपूर्ण सोहळ्यात अभिनेत्री रश्मी देसाईवर सर्वाधिक नजरा खिळल्या. तिने सोनेरी रंगाचा हाय स्लिट गाऊन घातला होता. पण, ‘बेस्ट ड्रेसिंग’मध्ये तिला तगडे आव्हान दिले ते म्हणजे अभिनेत्री मौनी राय हिने. ‘नागिन’ फेम या अभिनेत्रीने सुंदर असा फ्लोरल गाऊन घातला होता. या अभिनेत्रींव्यतिरीक्त रित्विक धनजानी – आशा नेगी, केथ सिक्वेरा – रोशेल राव, संजीदा शेख – आमिर अली, अर्जुन बिजलानी – नेहा स्वामी या जोड्याही पुरस्कार सोहळ्याला हजर होत्या.

First Published on November 6, 2017 1:20 pm

Web Title: ita awards 2017 red carpet photo mouni roy jennifer winget rithvik dhanjani glam up the night