News Flash

इटलीत होणाऱ्या दीप-वीरच्या लग्नाबद्दल पंतप्रधान म्हणतात..

भारतीय सेलिब्रिटींची लग्नासाठी इटलीला मिळालेली पसंती पाहून इटलीच्या पतंप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.

दीपिका- रणवीर

बॉलिवूडमधलं सर्वात लाडकं जोडपं दीपिका आणि रणवीर हे दोघंही या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी इटलीत हा विवाह सोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्यापही याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र भारतीय सेलिब्रिटींची लेक केमोला मिळणारी पसंती पाहून इटलीच्या पतंप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत इटलीचे पंतप्रधान ज्युझेपी काँटी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर क्षण इटलीतल्या या निसर्गरम्य परिसरात साजरा करणं कोणाला नाही आवडणार? बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींना ही जागा नक्की आवडेल आणि ते या जागेच्या प्रेमात पडतील याची मला खात्री आहे. अनेक पर्यटकांची पसंती इटलीला मिळत आहे. १८ व्या शतकापासून ही पर्यटकांची आवडती जागा ठरली आहे. इथे वैविध्यानं नटलेली संस्कृती आहे, इथे फॅशन आहे इथे चित्रपट आहे, इथे निसर्गासौंदर्यानं नटलेली ठिकाणं आहेत. बॉलिवूडमधल्या प्रत्येकाला ही जागा आवडेल आणि माझे विचार ते नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवतील अशी मला आशा आहे. इटलीतला अनेक पारिसर हा जवळजवळ हिमालयासारखाच आहे’ असं म्हणत काँटे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

रणवीर आणि दीपिका लेक केमो परिसरातील Villa del Balbianello या ठिकाणी विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन दिवस हा विवाहसोहळा रंगणार असून नंतर मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी जंगी रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:50 pm

Web Title: italian pm giuseppe conte on ranveer deepika wedding
Next Stories
1 Video : ‘सुलोचनादीदींना माझी भूमिका आवडेल की नाही याची धाकधूक वाटतेय’
2 १०० सर्वोत्तम परदेशी चित्रपटांमध्ये फक्त एकाच भारतीय चित्रपटाची वर्णी
3 सलमानचा राग घालवण्यासाठी प्रियांकाचे आटोकाट प्रयत्न
Just Now!
X