नेटफ्लिक्सवरची अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित वेब सीरिज म्हणून ‘सेक्रेड गेम्स’ची भरपूर चर्चा झाली. यातली प्रत्येक भूमिका आणि संवाद खूप गाजले. महाराष्ट्रातील छोटय़ाशा गावातून घरदार सोडून मुंबईत आलेला एकटा मुलगा कालांतराने या शहरातील नामचीन गँगस्टर (नवाजुद्दीन) होतो. नवाजुद्दीनने साकारलेली ही गणेश गायतोंडेची भूमिका जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचं अभिनय आणि उत्कृष्ट संवादफेक याची अनेकांनीच प्रशंसा केली. नवाजने साकारलेली ही भूमिका कशाप्रकारे जगभरात प्रसिद्ध होत आहे, याबाबत त्याने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘तनिष्ठा चॅटर्जी दिग्दर्शित एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त मी रोममध्ये होतो. त्याचवेळी सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे तिथले भारतीयच नव्हे तर स्थानिक लोकंही मला गायतोंडे म्हणून ओळखू लागले आणि माझ्या अभिनयाची स्तुती करू लागले. एखाद्या भूमिकेसाठी मला इतकं प्रेम कधीच मिळालं नव्हतं.’

Video : भाग्यश्रीच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, पाहा ट्रेलर

‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन आणखी चांगला असेल असं अनुराग कश्यपने सांगितल्याचं नवाजने म्हटलं. सध्या दुसऱ्या सिझनच्या पटकथालेखनाचं काम सुरू आहे. या नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.