सध्या बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. मराठी विश्वात शशांक केतकर, रोहन गुजर, आरोह वेलणकर, प्रार्थना बेहेरे यांसह अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यापाठोपाठ आता ‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मधुरा देशपांडे हीसुद्धा लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : पाच प्रोड्युसर्सनी माझी चक्क वाटणी केली होती, कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या अभिनेत्रीची व्यथा

मधुरा आणि आशय गोखले यांचा ५ ऑक्टोबरला साखरपुडा झाला होता. त्यानंतर नवीन वर्षात त्यांनी लग्न केले. मधुराच्या जवळच्या व्यक्तीने लग्नातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मधुराचा जोडीदार आशय हा मुळचा पुण्याचा असून तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. तसेच, ‘रिबन्स अॅण्ड बलून्स’मध्येही तो पार्टनर म्हणून कार्यरत आहे.

Padmaavat new teaser वाचा : रणरागिणीच्या रुपात पद्मावती

पिवळ्या रंगाची साडी नेसलेली वधूच्या वेषातील मधुरा फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर आशयने बंद गळा शेरवानी घातल्याचे दिसते. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत मधुराने तिच्या जोडीदाराविषयी सांगितले होते. ती म्हणालेली की, दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात, या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. त्याच्या आणि माझ्या स्वभावात बराच फरक आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्या तो भरून काढेल आणि त्याच्या आयुष्यातील कमतरता मी भरून काढेन. याच गोष्टीवर माझा विश्वास बसल्यामुळे मी लग्नाला होकार दिला. आशय मला नेहमीच पाठिंबा देतो. मी अभिनय क्षेत्रात असल्यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मला सहकार्य मिळते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ithech taka tambu fame marathi actress madhura deshpande got married
First published on: 20-01-2018 at 11:06 IST