News Flash

It’s Official: नात्यावर शिक्कामोर्तब करत अखेर निक-प्रियांका म्हणाले….

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या दोघांनीही आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, priyanka chopra and nick jonas

priyanka chopra and nick jonas. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास या दोघांनीही अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलं आहे. प्रियांकाच्या मुंबईतील घरी पार पडलेल्या एका छोटेखानी सोहळ्यात त्या दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाच्या नव्या पायरीवर पाऊल ठेवलं. यावेळी प्रियांका आणि निकचे कुटुंबिय उपस्थित होते.

काही कलाकार मित्रमंडळी आणि कुटुंबिय यांच्यासमवेत आपण नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचा आनंद प्रियांका आणि निकच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी त्या दोघांनीही भारतीय वेशभूषेला प्राधान्य दिलं होतं. पिवळ्या रंगाच्या लांब बाह्यांच्या लेहंग्यामध्ये प्रियांकाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. तर, निकही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत तिला शोभून दिसत होता.

Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

सोशल मीडियावर या नव्या जोडीचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात होताच, अवघ्या काही मिनिटांमध्ये निक आणि प्रियांका या दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नात्यावर शिक्कामोर्बत केलं. ‘माझं मन आणि आत्मा तुझंच झालं आहे….’ असं लिहित प्रियांकाने सुरेख फोटो पोस्ट केला. तर, ‘या आहेत भावी मिसेस जोनास…’, असं लिहित निकनेही तोच फोटो पोस्ट केला. कलाविश्वातील या बहुचर्चित जोडीने त्यांच्या नात्याची माहिती देताच अभिनेता रणवीर सिंग, सोनम कपूर यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रियांकाला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. त्याशिवाय सध्या सोशल मीडियावरही त्यांच्या साखरपुड्याचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला असून, चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 4:00 pm

Web Title: its official here is the first post of newly engaged couple bollywood actress priyanka chopra and american singer nick jonas
Next Stories
1 Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला
2 सहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा
3 Kerala floods: देवभूमीसाठी कलाकारांनीही दिला आर्थिक मदतीचा हात, केली याचना
Just Now!
X