28 September 2020

News Flash

IT’S OFFICIAL ! विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत !

उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा शिवधनुष्य पेलणार आहे. यापूर्वी उमंग यांनी मेरी कोमच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलली होती.

बॉलिवूडमध्ये २०१९ हे वर्ष एका अर्थानं खास ठरणार आहे. कारण या वर्षांत बड्या राजकीय नेत्यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘ठाकरे’, ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ नंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपटही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेसाठी अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नावावर शिक्कामोहर्तब करण्यात आलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेपासून फारकत घेतलेला विवेक या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. विवेक या चित्रपटात तरुणपणीच्या मोदींची भूमिका साकारत आहे. तर परेश रावल नंतरच्या काळातील मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहे. परेश रावल यांच्या नावाची घोषणा गेल्याच वर्षी करण्यात आली होती.

उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा शिवधनुष्य पेलणार आहे. यापूर्वी उमंग यांनी मेरी कोमच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलली होती. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 12:00 pm

Web Title: its official vivek oberoi will play pm narendra modi role in biopic
Next Stories
1 ‘ठाकरे’ चित्रपटासाठी ‘चीट इंडिया’च्या प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे
2 ‘कादर खान शेवटपर्यंत अमिताभ बच्चन यांची आठवण काढत होते’
3 कादर खान यांना गोविंदानं एकदाही फोन केला नाही- सरफराज खान
Just Now!
X