News Flash

Video : ‘हे अत्यंत वेदनादायी’; सुशांतशिवाय परफॉर्म करताना अंकिता भावूक

'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांत-अंकिताने एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

अंकिता लोखंडे

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर तू सुशांत सिंह राजपूतला विसरलीस का, असा सवाल करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आता अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी तयारी करतानाचा हा व्हिडीओ आहे. मात्र यंदा सुशांतशिवाय परफॉर्म करणं अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हणत ती भावूक झाली.

अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत यांनी झी टीव्ही वाहिनीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या जोडीवर प्रेक्षकांनीही प्रेमाचा वर्षाव केला होता. आता त्याच वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात सुशांतला आदरांजली वाहण्यासाठी अंकिता परफॉर्म करणार आहे. नेहा कक्कर आणि सनी कौशल यांच्या ‘तारों के शहर’ या गाण्यावर ती डान्स करणार आहे. त्यासाठी सराव करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

‘यावेळी परफॉर्म करणं खूप कठीण आणि वेगळं असणार आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 9:38 pm

Web Title: its painful ankita lokhande to pay tribute to sushant singh rajput at award ceremony ssv 92
Next Stories
1 ‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा
2 कंगना रणौतचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर, म्हणाली…
3 ड्रग्ज प्रकरणामुळे भारती सिंहची होणार ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी?
Just Now!
X