News Flash

सोशल मीडियावर श्रद्धा आणि आलियाच्या चाहत्यांमध्ये जुंपली

अभिनय, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व याबाबतीत आलिया सरस आहे की श्रद्धा असा वादच सोशल मीडियावर सुरू झाला.

आलिया भट्ट, श्रद्धा कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांचीच जोरदार चर्चा आहे. आलिया भट्टच्या ‘राजी’ आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जणू एक नवीन ट्रेण्डच तयार केला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरले आणि त्यामुळेच सोशल मीडियावर दोघींचे चाहते एकमेकांसमोर आले आहेत.

शुक्रवारी ट्विटरवर आलिया आणि श्रद्धाचे चाहते यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. काही वेळातच #RazivsStree हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होऊ लागला. अभिनय, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व याबाबतीत आलिया सरस आहे की श्रद्धा असा वादच सोशल मीडियावर सुरू झाला.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाने एका आठवड्यात ६०.३९ कोटी रुपये कमावले. तर आलिया आणि विकी कौशल यांच्या ‘राजी’ने एका आठवड्यात ५६.५९ कोटी रुपये कमावले होते.

#RAAZIvsSTREE या हॅशटॅगसोबतच या दोन्ही चित्रपटांचं यश चाहत्यांनी सोशल मीडियावर साजरा केला. ‘राजी’ आणि ‘स्त्री’ या दोन्ही चित्रपटांचे विषय, कथा आणि विभाग जरी वेगळे असले तरी यातील मुख्य कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आता आलिया आणि श्रद्धामध्ये एकप्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:15 pm

Web Title: its shraddha kapoor vs alia bhatt on social media and raazi vs stree
Next Stories
1 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेचे १०० भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन
2 मराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला दहा टक्के वाटा
3 Video : रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र; ‘पेट्टा’चा मोशन पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X