अमेरिकेतील टीव्ही अभिनेत्री किम कर्दाशियन लवकरचं बिग बॉसच्या घरात येणार आहे. कलर्स वाहिनीच्या टीमने किम कर्दाशियनला आमंत्रण दिल्याचे कळते.
सलमान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये लवकरच किम कर्दाशियन येणार आहे. सदर वाहिनीने तिच्या येण्याच्या बातमीस दुजोरा दिलेला असून २२ नोव्हेंबरला ती बिग बॉसमध्ये येईल. मात्र, ती बिग बॉसची सदस्य असेल की केवळ पाहुणी याबाबत माहिती देणे वाहिनीने टाळले. “नमस्ते इंडिया.. मै किम कर्दाशियन आ रही हू.. बिग बॉस के घर” असे तिच्या आवाजातील वाक्य वाहिनीने प्रसिद्ध केले आहे. सध्या कीम ही जागतिक दौ-यावर आहे. पती आणि मुलीला घरी ठेवून दौ-यावर असलेल्या कीमने, “मला माझ्या मुलीची खूप आठवण येत आहे. एका आठवड्यात तीन देशांची भेट खूपच धावपळ असल्यामुळे तिला सोबत नाही घेऊ शकले. असे ट्विट केले आहे.”