16 December 2017

News Flash

Ittefaq Trailer: गूढ कथेत पाहता येणार सिद्धार्थ- सोनाक्षीची केमिस्ट्री

यश चोप्रा दिग्दर्शित 'इत्तेफाक' सिनेमाचा हा रिमेक आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 3:21 PM

इत्तेफाक

सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आगामी ‘इत्तेफाक’ सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात दोघंही वेगवेगळ्या अंदाजात दिसतात. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाचाही दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. सिनेमाची कथा ही एका गुढ हत्येभोवती फिरताना दिसते. या ट्रेलरच्या माध्यमातूनही लोकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आलाय.

ट्रेलरच्या सुरूवातीलाच सिद्धार्थ आणि सोनाक्षीच्या व्यक्तिरेखेची ओळख करुन देण्यात आली. सिद्धार्थ सिनेमात विक्रम नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, सोनाक्षी मायाच्या भूमिकेत दिसेल. सिनेमात जरी हे दोघे रोमॅण्टिक कपल म्हणून दिसत नसले तरी त्या दोघांमधील केमिस्ट्री नक्कीच लक्षवेधक आहे. सिनेमात दोन हत्या झालेल्या दाखवण्यात आल्या आहेत. या दोन्ही खुनाच्या आरोपात सोनाक्षी आणि सिद्धार्थला अटक करण्यात आलेली असते. आता हा खून नक्की कोणी आणि का केला याची उकल अक्षय खन्ना कशी करेल यासाठी हा सिनेमा पाहावाच लागेल.

यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ सिनेमाचा हा रिमेक आहे. ७० च्या दशकात आलेल्या या सिनेमात राजेश खन्ना आणि नंदा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन अभय चोप्राने केलेय. अभय हा फिल्ममेकर बी. आर. चोप्रा यांचा नातू आहे. या सिनेमासाठी करण आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.

First Published on October 5, 2017 3:21 pm

Web Title: ittefaq trailer out sonakshi sinha and sidharth malhotra unseen chemistry