27 September 2020

News Flash

सलमानसोबत लग्न कधी करणार?; चाहत्यांच्या प्रश्नावर लुलीया म्हणाली…

अभिनेत्रीने चाहत्यांना दिलं थक्क करणारं उत्तर

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चित्रपटांइतकाच त्याच्या तथाकथीत प्रेससींमुळेही चर्चेत असतो. त्याचे नाव आजवर संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, झरिन खान यांसारख्या काही अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सध्या तो अभिनेत्री लुलीया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. याच निमित्ताने सलमानसोबत लग्न कधी करणार? असा प्रश्न लुलीयाला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने देखील थक्क करणारे उत्तर दिले आहे.

काय म्हणाली लुलीया?

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत लुलीया म्हणाली, “कुठल्याही नात्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांबाबत काय विचार करतात हे जास्त महत्वाचे आहे. मी आणि सलमान आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. लग्नाचं म्हणाल तर माझी आई देखील अनेकदा मला हा प्रश्न विचारते. परंतु मला असं वाटतं की लग्न करणं जास्त महत्वाचं आहे की आनंदी असणं. अर्थात आनंदी असणं. कारण लग्न आणि आनंद यांचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे कोणासोबत लग्न करण्याचा अद्याप निर्णय मी घेतलेला नाही.” अशा आशयाचे उत्तर लुलीयाने दिले.

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जवळपास प्रत्येक मुलाखतीत त्याला हा प्रश्न विचारला गेला आहे. पूर्वी तो कतरिनासोबत लग्न करणार असं म्हटलं जात होतं. परंतु अशाच चर्चा आता लुलीयाच्या बाबतीतही सुरु आहे. लुलीया एक रोमानियन अभिनेत्री आहे. ‘फ्रेमा’ आणि ‘डान्सेस पेत्रू टिने’ या दोन रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केले आहे. ती एक उत्तम डान्सरदेखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 1:20 pm

Web Title: iulia vantur plan on getting married to salman khan mppg 94
Next Stories
1 मेडिकलमधून दारु खरेदी केली का?; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री म्हणाली…
2 Video : दीपिकाने इरफान खानला पाहिले अन्…
3 सलमानचा राधे होणार OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित?
Just Now!
X