बॉलिवूडमध्ये किरण खेर या प्रसिद्ध आहेत. चित्रपटांव्यतिरीक्त किरण यांना आपण टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोचे परीक्षण करतानाही पाहिले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्या रुपेरी पडद्यापासून दुरावल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी एकाही चित्रपटात काम केले नाही.

वाचा : उर्मिला कोठारे का म्हणते, ‘बेबी को बेस पसंद है’

किरण खेर चंदीगढमधील लोकसभेच्या खासदार आहेत. आता त्यांच्याकडे चित्रपट करण्यासाठी वेळ नसल्याचे स्वतः किरण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘आता मी माझ्या परिसरातील आणि लोकसभेच्या कामात बरीच व्यस्त आहे. त्यामुळे माझ्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी वेळ नाही.’ त्या चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्या असल्या तरी दिग्दर्शक त्यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी संपर्क साधत असतात. याविषयी त्या म्हणाल्या की, ‘गेल्या तीन वर्षांत मी एकाही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाहीच पण त्याचसोबत दोन चित्रपटांना नकारही दिला. यातील एक चित्रपट शबाना आझमी करत असून, तो प्रेमचंद यांच्या ‘ईदगाह’ वर आधारित आहे. मला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते पण माझ्याकडे वेळ नसल्याने मी त्यांना नकार दिला.’

वाचा : पाटण्याच्या प्रभाकर शरणचा दक्षिण अमेरिकी चित्रपटसृष्टीत गवगवा

अशा अनेक गोष्टी माझ्यासमोर येतात ज्यांना मी नकार देते. चित्रपटांच्या स्क्रिप्ट माझ्याकडे येत असतात पण मला भावेल अशी कथा सध्या तरी माझ्या नजरेत नाही. अशी एखादी स्क्रिप्ट आली तर मी नक्कीच वेळ काढून त्या चित्रपटात काम करेन, असेही किरण म्हणाल्या.