News Flash

‘या’ कारणामुळे जान कुमार सानूला ‘खतरो के खिलाडी’मध्ये सहभागी व्हायचं नाही

एका मुलाखतीत 'खतरो के खिलाडी' या शोमध्ये सहभागी न होण्याचा खुलासा जान कुमार सानूने केला आहे

जान कुमार सानू हा लोकप्रिय संगितकार आणि गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. जान कुमार स्वत: देखील उत्कृष्ट गायक आहे. जान सोशल मीडीयावर सक्रिय असून तो सतत आपल्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. जान कुमार सानू त्याच्या शांत आणि गोड स्वभावासाठी ओळखला जातो.

‘बिग बॉस’च्या घरातली भांडण असो किंवा निक्की बरोबर त्याची मैत्री. जानने प्रत्येक वेळेस त्याच्या दिलखुलास स्वभावाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं असलं तरी याचा फायदा त्याला शोसाठी फारसा झाला नाही. बिग बॉस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात तो शोमधून बाहेर पडला.

‘बिग बॉस’ नंतर, ‘बिग बॉस’मधील स्पर्धक निक्की तांबोळी, राहुल वैद्द, आभिनव शुक्ला कर्लसवरील आगामी स्टंट बेस शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये  सहभागी झाले आहेत. मात्र या शोमध्ये सहभागी होण्यास कुमार सानूने नापसंती दर्शवली आहे. एका मुलाखतीत ‘खतरो के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी न होण्याचा खुलासा जान कुमार सानूने केला आहे. ईटीटाइम्सला दिलेल्या या मुलाखतीत तो म्हणाला,”मी कधीच अशा शोचा भाग होणार नाही. एकतर मला खूप भिती वाटते, मला किडे- किटकांची आणि प्राण्यांची प्रचंड भिती वाटते. हे किडे माझ्या अंगावर चालत आहेत याची मी कल्पनाच करू शकत नाही.” पुढे तो म्हणाला, “बिग बॉसच्या घरात आम्ही अनेकदा गार्डनमध्ये राहायचो. तेव्हा तिथे देखील बरेच किटक आणि माकडं यायची. तेव्हा मी खूप घाबरायचो. माझ्यासाठी तेच कठीण होत. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभागी होणं हे तर दूरच राहिलं” असं म्हणत जान कुमार सानूने शोमध्ये फक्त स्टंट असते तर तो नक्की सहभागी झाला असता हे देखील स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaan Kumar Sanu (@jaan.kumar.sanu)

हे देखील वाचा: Viral Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे..’, स्टाफकडून सॅण्डल काढून घेतल्याने शहनाज गील झाली ट्रोल

या मुलाखतीत जान कुमार सानूने तो ‘खतरो के खिलाडी’ च्या ११ व्या पर्वात अभिनव शुक्लाला सपोर्ट करत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “मी अभिनव शुक्लला सपोर्ट करतो. त्याला निसर्गात राहायाला आवडते त्याला जनावरंदेखील आवडतात, मला असं वाटतं, हा शो अभिनवसाठी परफेक्ट आहे. ” असं जान म्हणाला.

‘खतरो के खिलाडी’ च्या ११ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्लासह अभिनेत्री श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी तसचं अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य सिंह सहभागी झाले असून या शोचं शूटिंग सध्या दक्षिण अफ्रिकेतील केप टाऊनमध्ये सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 8:23 pm

Web Title: jaan kuamar sanu revels why he never become part of khatron ke khiladi kpw 89
टॅग : Entertainment News
Next Stories
1 ‘नो रिस्क, नो स्टोरी..’, प्रेग्नेंट नुसरत जहां यांनी शेअर केलं स्विमिंगपूलमधलं फोटो शूट
2 Video: ‘समांतर २’मध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? स्वप्नील जोशी म्हणतो…
3 ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापेस्टला पोहोचला अर्जुन रामपाल; मुलगा आणि गर्लफ्रेंडसोबत करतोय मजा
Just Now!
X