News Flash

जान कुमार सानूने शेअर केले बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो; म्हणाला, “धन्यवाद एजाज खान, मला त्रास दिल्याबद्दल!”

"आता फक्त वाट पाहतोय लवकरच..."

‘बिग बॉस’ फेम गायक जान कुमार सानूची ओळख सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा म्हणून केली जाते. परंतू नुकतंच जान कुमार सानूने स्वतःमध्ये शॉकिंग बदल करून एक नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जान कुमार सानूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे हे फोटो पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंना शेअर करताना जानने त्याच्या मनातली गोष्ट कॅप्शनमध्ये लिहिली आहे. स्वतःमध्ये केलेल्या बदलांचे क्रेडीट त्याने ‘बिग बॉस’चा एक्स कंटेस्टेंट एजाज खानला दिले आहेत. या फोटोमध्ये तो पहिल्यापेक्षा स्लिम झालेला दिसून येत आहे.

सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर बराच चर्चेत आला होता. पण आता त्याच्यामध्ये आश्चर्यजनक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहेत. जानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये एक बनियान दिसून येत आहे. ही बनियान त्याने ‘बिग बॉस’ शोमध्ये असताना घातली होती आणि यावर गौहर खानच्या लिपस्टिकचे निशाण देखील दिसून येत आहेत. यात त्याने लिहिलंय, “बिग बॉसमध्ये सिंगिंग टास्क दरम्यान एजाज खानने माझ्यासाठी बनियान पोस्टर बनवलं होतं…गौहरने यावर प्रेमाने तिच्या लिपस्टिकचे स्टॅम्प देखील लावले होते…मी एजाज आणि गौहरला शब्द दिला होता की एक ना एक दिवस मी या बनियानमध्ये फिट होऊनच दाखवणार आणि हीच बनियान घालून मी म्यूझिक कॉन्सर्ट देखील करून दाखवणार…गेल्या ६ महिन्यात मी स्वतःला इतकं फिट केलंय…मी जो शब्द दिला तो पूर्ण केलाय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaan Kumar Sanu (@jaan.kumar.sanu)

त्रास दिल्याबद्दल एजाज खानचे मानले आभार…
या कॅप्शनमध्ये पुढे त्याने लिहिलं, “धन्यवाद, एजाज भाई…बिग बॉस हाऊसमध्ये मला दिलेल्या त्रासाबद्दल…माझ्याकडे आजही ही बनियान आहे आणि मी वाट बघतोय लवकरच लॉकडाउन संपल्यानंतर माझ्या पहिल्या म्यूझिक कॉन्सर्टची…मी शब्द दिला होता की हीच बनियान घालून मी पहिली म्यूझिक कॉन्सर्ट करणार म्हणून…”. सोबतच जानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. यात तो आरशात स्वतःला बघताना काढलेला एक सेल्फी दिसून येत आहे.

Jaan Kumar Sanu Body Transformation (Photo: Instagram@jaan.kumar.sanu)

 

जान कुमार सानू हा बिग बॉस १४ मधला पहिला स्पर्धक होता. ‘बिग बॉस’ शो दरम्यान त्याने आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली तर होतीच, पण त्याच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे देखील केले होते. त्याच्या लहानपणीचे किस्से आणि आईकडून झालेल्या संगोपनाबद्दल त्याने या शोमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. या शो दरम्यान निक्की तांबोळीसोबत त्याची चांगलीच गट्टी जमली होती. निक्की तांबोळी सध्या तिचा दुसरा रिएलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 2:17 pm

Web Title: jaan kumar sanu shares photos of epic body transformation thanks eijaz khan for harassing and pushing him prp 93
Next Stories
1 डॉ. अजित कुमार देव आणि डिंपलची लगीनघाई
2 पलक तिवारीने डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; सोशल मीडियावर चर्चा
3 पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला
Just Now!
X