News Flash

सुषमाजी मला वाचवा, ‘जब हॅरी मेट सेजल’ बघायला गेलेल्या प्रेक्षकाचं ट्विट व्हायरल

पुढच्या आठवड्यात शाहरुखच्या सिनेमाला डोकं वर काढण्याचीही संधी मिळणार नाही

शाहरूख खान, अनुष्का शर्मा

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करु शकला नाही. सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये या सिनेमाचे कलेक्शन फारच कमी होते. शिवाय समीक्षक आणि चाहत्यांकडूनही या सिनेमाबद्दल फार काही चांगले ऐकायला मिळाले नाही. या सगळ्यामध्ये आता एका प्रेक्षकाने सिनेमाशी निगडीत ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले.

शाहरुखने फ्रेंडशिप डेच्या दिवशी असा पाळला आमिरचा शब्द

विशाल सूर्यवंशी असे या युझरचे नाव असून त्याने चक्क परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत म्हटले की, ‘मॅडमजी कृपा करुन मला वाचवा. मी पुण्यात, हिंजवडी येथे ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमा पाहतोय.’ विशालचे हे ट्विट सोशल मीडियावर एवढे व्हायरल झाले की या ट्विटला १००० हून अधिक जणांनी रिट्विट केले. सुषमा स्वराज नेहमीच गरजूंची मदत करतात. त्यामुळेच विशालने हा सिनेमा पाहण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वराज यांच्याकडेच मदत मागितली.

‘जब हॅरी मेट सेजल’ने पहिल्या दिवशी फार खराब सुरूवात केली होती. शुक्रवारी या सिनेमाने फक्त १५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवसाची कमाई १५ कोटी रुपये होती. गेल्या पाच वर्षांमधील शाहरुखच्या सिनेमांच्या कलेक्शनमधील सर्वात कमी कमाई या सिनेमाने केली. २०१२ मध्ये आलेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई १५.२३ कोटी रुपये होती.

‘जब हॅरी मेट सेजल’चे एकूण बजेट ८० कोटी रुपये आहे. या सिनेमाची कलेक्शनची गती पाहता सिनेमा गुंतवलेले पैसेही मिळवू शकेल की नाही याची शंका येत आहे. तसेच या आठवड्यात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यामुळे फक्त या आठवड्यामध्येच शाहरुखचा सिनेमा गल्ला कमवू शकतो. प्रेक्षकांमध्ये अक्षयच्या या सिनेमाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात शाहरुखच्या सिनेमाला डोकं वर काढण्याचीही संधी मिळणार नाही असेच म्हणावे लागेल.

मी माझ्या काकांमुळेच सिनेसृष्टीत टिकलो- इम्रान हाश्मी

‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा टुरिस्ट आणि गाइड यांच्या अवतीभवती फिरतो. अनुष्का युरोप फिरायला गेली असता तिची साखरपुड्याची अंगठी हरवते. यानंतर शाहरुख आणि अनुष्का ती अंगठी शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. तिथेच त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटायला लागतं, अशा धाटणीची ही कथा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 2:03 pm

Web Title: jab harry met sejal shahrukh khan sushma swaraj twitter anushka sharma
Next Stories
1 ४४ डिग्री तापमानात शूट करताना अशी दिसतेय कतरिना
2 Raksha Bandhan 2017: …म्हणून हेमा मालिनीने रजनीकांत यांना चक्क राखी बांधली
3 ..म्हणून साराला मुलांपासून दूर ठेवण्याचा अमृता करतेय प्रयत्न
Just Now!
X