27 February 2021

News Flash

Video: अॅक्शन स्टार जॅकी चेनच्या मुलीवर पुलाखाली राहण्याची वेळ

जॅकी चेनची मुलगी लेस्बियन असून गर्लफ्रेंडसोबत ती राहात आहे.

Video: अॅक्शन स्टार जॅकी चेनच्या मुलीवर पुलाखाली राहण्याची वेळ

अॅक्शन स्टार जॅकी चेनची मुलगी बेघर असून पूलाखाली राहण्याची वेळ तिच्यावर आली आहे. आपण बेघर असून हाँगकाँगच्या रस्त्यांवर राहत असल्याचं जॅकी चेनची मुलगी एटा एनजीने Etta Ng म्हटलं आहे. १८ वर्षीय एनजी लेस्बियन असून गर्लफ्रेंड अँडी ऑटोमनसोबतचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

समलैंगिक संबंधांना नकार देणारे माझे पालक माझ्या या परिस्थितीला जबाबदार आहेत असं ती या व्हिडिओत म्हणतेय. ‘गेल्या महिनाभरापासून आम्ही बेघर आहोत. आम्ही पोलिसांकडे, फूड बँकमध्ये, LGBTQ कम्युनिटीकडेही मदत मागितली, पण कोणीच आमची मदत केली नाही,’ असं ती त्या व्हिडिओत म्हणते.

वाचा : गणवेश हा काही फक्त कापडाचा तुकडा नाही, ‘रुस्तम’मधील त्या पोशाखाच्या लिलावावर ट्विंकल खन्ना ट्रोल

सध्याच्या घडीला काय करावं हेच समजत नसून हा व्हिडिओ पोस्ट केल्याचं तिने स्पष्ट केलं. सौंदर्यवती इलेन एनजी आणि जॅकी चेनची ही मुलगी आहे. जॅकी माध्यमांसमोर या मुलीविषयी कधीच खुलेपणाने व्यक्त झाला नाही पण इलेनसोबतचं अफेअर त्याने कधीच नाकारलं नाही.
एनजीच्या आईने म्हणजेच इलेननं तिच्या व्हिडिओ पोस्ट करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. ‘त्यांनी काहीतरी काम शोधलं पाहिजे. अशाप्रकारे व्हिडिओ पोस्ट करून आपले वडील कोण आहेत, हे सांगण्याची गरज नव्हती. पैसा मिळवण्यासाठी इतरांच्या प्रसिद्धीचा फायदा घेणं चुकीचं आहे,’ असं तिनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 4:48 pm

Web Title: jackie chan daughter is homeless living under bridge with girlfriend watch video
Next Stories
1 प्राण्यांसाठी अनुष्का झाली ‘परी’, वाढदिवसानिमित्त सुरु केलंय अॅनिमल शेल्टर
2 प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या ‘काला’ने गाठली ‘ही’ उंची
3 ‘मंकी कपल’ने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस
Just Now!
X