बॉलीवूडमध्ये काम करण्यास आवडेल का? ….. असा प्रश्न भारत भेटीला आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांना विचारला जातो. त्याचप्रमाणे जॅकी चॅनला हा प्रश्न विचारला असता ” हो, निश्चितच ” असे त्याने उत्तर दिले. मोठा चाहता वर्ग असणारा आणि भारतातील प्रेक्षकांनाही आवडणा-या जॅकी चॅनने पहिल्या चीन चित्रपट महोत्सवाचे त्याने दिग्दर्शित केलेल्या ” चीनी राशिचक्र ” या चित्रपटाने उद्घाटन केले. त्यानंतर अभिनेता,दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या जॅकी चॅनने त्याचे प्रसिद्ध ” कन्ट्री ” हे गाणे भारतीय प्रेक्षकांसमोर सादर केले.

२००५ साली एका पत्रकार परिषदेत त्याने मल्लिका शेरावतला त्याच्या ” द मिथ ” या चित्रपटात संधी दिली होती. १० वर्षांपूर्वी त्याच्या ” द मिथ ” चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता तो एक महिना भारतात राहिला होता. त्यावेळेस त्यांने काही बॉलीवूड चित्रपट पाहिले होते. तसेच आपल्याला भारतातील सर्व गोष्टी आवडतात असे सांगत आमीरचा ३ इडियट, बॉलीवूड, चिकन कढाई व बिर्याणी या त्याच्या आवडीच्या गोष्टी असल्याचे तो म्हणाला. आपण एक चांगले गायक आहोत असे सांगताना भारतातील दिग्दर्शक आपल्याला चांगल्या भूमिकेची संधी देतील अशी आशा त्याने व्यक्त केली. मी नुसती फायटिंगच करत नसून एक चांगला अभिनेता देखील आहे असेही तो खोडकरपणे हसत म्हणाला.

भारतात केवळ “3इडियट” च नाही तर अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत जे चांगले आहेत. परंतु जागतिक पातळीवर त्यांची पुरेशी प्रसिद्धि मिळाली नाही. भारतात चांगले अॅक्शन हिरोज आणि सुंदर अभिनेत्री आहेत. कदाचित, जंगातील सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शकही येथे आहेत. मात्र, नाचाच्या बाबतीत आपण बॉलीवुड नंबरवर नृत्य करण्यासाठी कुठेतरी कमी पडत असल्याचे त्याने सांगितले.