23 November 2020

News Flash

जॅकी श्रॉफच्या ‘या’ जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही घेऊ शकता एक गाडी

एखादी जमिन किंवा फॉरेन ट्रीपही करु शकता

जॅकी श्रॉफ

बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ त्याच्या लूकला आणि स्टाइलला सातत्याने बदलत असतो. त्याच्या स्टाइल स्टेटमेंटच्या तर चर्चाही होतात. जॅकीने काऊ- बॉय लूकपासून कोट पँटमधला लूक ट्राय केला आहे. नुकतेच त्याने लुईस विटोन या कंपनीचे जॅकेट घातले होते. विमानतळावरचा त्याचा हा स्पोर्टी लूक अनेकांचे लक्ष वेधत होता. पण तुम्हाला या जॅकेटची किंमत माहित आहे का? या सुप्रीम कलेक्शन जॅकेटची किंमत आहे ३ लाख रुपये.

जॅकेटच्या किंमतीत कोणताही मध्यम वर्गीय माणूस जमिनीचा छोटा तुकडा विकत घेई शकतो. तसेच एखादी परदेशवारीही करु शकतो. एवढेच काय तर घरासमोर स्वप्नवत आवडती गाडी उभी करु शकतो. पांढरे शर्ट, जॅकेट, जीन्स आणि गॉगल घातलेला जॅकी फारच हँडसम दिसत होता यात काही शंका नाही. सध्या जॅकीचा हा लूक सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

जॅकीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही महिन्यांमध्ये तो ‘सरकार ३’, ‘हाऊसफुल ३’ आणि ‘फ्रीक्री अली’ सिनेमांत दिसला होता. एटीएम सिनेमात त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी जॅकीच्या कामाचे कौतुक झाले होते.

जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. टायगरचा ‘बागी- २’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. टायगरसह या सिनेमात त्याची कथित प्रेयसी दिशा पटानीही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 5:04 am

Web Title: jackie shroff wearing louis vuitton x supreme jacket airport costs rupees 3 lakhs
Next Stories
1 आता अभिनयाच्या मैदानावरही युवराज मारणार षटकार?
2 जाणून घ्या, शाहरुखने ‘पद्मावत’ला का दिला होता नकार?
3 फ्लॅशबॅक : प्रत्येक काळात तरुण चित्रपट असतोच पण…..
Just Now!
X