News Flash

“बिचारे, बाहेर खेळण्याच्या दिवसात घरात बसून आहेत”, लहानग्या हिरोंसाठी जॅकलीनची खास पोस्ट

तिच्या या पोस्टचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिची नवी पोस्ट तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिने लहान मुलांचं कौतुक केलं आहे.

लहान मुले उन्हाळ्याच्या सुट्ट्या असूनही बाहेर खेळायला न जाता घरी राहत असल्याबद्दल तिने त्यांचं कौतुक केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “सगळे जण सगळ्यांचं कौतुक करत आहेत. पण आपली लहान मुलं. हे लहान हिरो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ घरात राहिले आहेत. त्यांचं पूर्ण जगच बदलून गेलं. हे सगळे नियम त्यांना काहीच कळत नाहीत. मोठे लोक काहीतरी वाईट असल्याबद्दल बोलत असतात, बातम्यांमध्ये खूप लोक मरत असल्याचं सांगतात. बिचाऱ्या लहान मुलांच्या मनात काय चाललं असेल? दररोज ते उठल्यापासून काय चाललंय ते बघत असतात. आज, उद्या कायमच हे छोटे आपल्यासाठी हिरो असतील”.

जॅकलीनने ही पोस्ट केल्यावर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी या पोस्टवर कमेंट्स करत लहानग्यांचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने या तिच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे.

शिल्पा दोन मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा विआन आठ वर्षांचा आहे तर लहान मुलगी समिशा एक वर्षाची आहे. एकता कपूरही एक वर्षाच्या मुलाची आई आहे. ती लिहिते, “मी आत्तापर्यंत वाचलेली सगळ्यात छान गोष्ट. माझ्या मुलाला मास्क सॅनिटायझरबद्दल कळू लागलं आहे. सगळं बंद असल्याने त्याने मोकळ्या हवेचा अनुभव अजून घेतलेलाच नाहीये”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 7:54 pm

Web Title: jacqline fernandese wrote a post about children staying inside home during this tough time vsk 98
Next Stories
1 स्वप्निल जोशीचा महत्वाचा निर्णय; ” सोशल मीडियाचा वापर करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी”
2 “या” ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकता ऑस्कर नामांकनप्राप्त चित्रपट!
3 “आपल्या राज्यकर्त्यांनी मोकळा श्वासही दिला नाही..ब्रिटीश काही वर्ष अजून हवे होते”- केदार शिंदे
Just Now!
X