News Flash

जॅकलीन फर्नांडिस ‘सीक्रेट बॉयफ्रेण्ड’सोबत नव्या घरात राहणार एकत्र!

जॅकलीन आणि तिचा बॉयफ्रेण्ड एका सिरियस रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघं सतत व्हिडीओ कॉलवर एकमेकांच्या संपर्कात राहतात.

(photo-instagram@jacquelinef143)

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केलीय. जॅकलीनच्या डान्सची जादू आणि तिच्या सौदर्यांने तिने चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली असली तरी जॅकलीनने तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा खुलासा केलेला नाही. मात्र आता जॅकलीनच्या ‘सीक्रेट बॉयफ्रेण्ड’ बद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत.

जॅकलीन गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जूहू परिसरात नवं घर शोधतं आहे. या घरात ती तिच्या बॉयफ्रेण्डसोबत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ईटीटाईम्सच्या वृत्तानुसार जॅकलीनचा पार्टनर हा दक्षिणेतील एक उद्योजक असून दोघं मुंबईत एकत्र राहण्यासाठी नव्या घराच्या शोधात होते.

हे देखील वाचा: ‘मेरे रश्के कमर’ गाण्यामुळे नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

तर एका वृत्तानुसार अखेर जॅकलीनला जूहू परिसरात एक घर मिळालं असून तिने या घरासाठी काही रक्कम देखील दिली आहे. मात्र अद्याप पेपर वर्क पूर्ण झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे तिच्या नव्या घराच्या कागदपत्रांचं काम रखडलं आहे. हे घर समुद्र किनाऱ्याजवळ असून आता या नव्या घराच्या सुशोभीकरणासाठी जॅकलीनने तयारी देखील सुरु केलीय. यासाठी जॅकलीनने खास फ्रान्समधील एका इंटेरिअर डिझायनरशी संपर्क साधला आहे.

जॅकलीनचा बॉयफ्रेण्ड कोण?

दरम्यान वृत्तानुसार जॅकलीन आणि तिचा बॉयफ्रेण्ड एका सिरियस रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघं सतत व्हिडीओ कॉलवर एकमेकांच्या संपर्कात राहतात. असं असलं तर अद्याप जॅकलीनने या नात्याबद्दल खुलास केलेला नाही. बॉयफ्रेण्ड किंवा रिलेशनशिप बद्दलच्या या गोष्टी तिने खासगी ठेवल्या आहेत. तर चाहत्यांमध्ये मात्र आता जॅकलीनचा बॉयफ्रेण्ड नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

हे देखील वाचा: “नानू हलवाई ते नानू जलवाई”; आदित्य नारायणच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकवर विक्रांत मेस्सीची मजेशीर कमेंट

दरम्यान जॅकलीन नुकतीच रॅपर बादशहाच्या गाण्यात झळकली होती. ‘पानी पानी’ हे बादशाहचं गाणं चांहगलं हिट ठरतंय. या गाण्यातील जॅकलीनच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. तर या आधी देखील बादशहा आणि जॅकलीनच्या ‘गेंदा फूल’ या अल्बमला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 2:12 pm

Web Title: jacqueline fernandez buy new house in juhu ready to move with her entrepreneur boyfriend kpw 89
Next Stories
1 “अबोल प्रेमाचा रांगडा बाज”, ‘जीव माझा गुंतला’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
2 ‘मेरे रश्के कमर’ गाण्यामुळे नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले…
3 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चित्रपट येणार? आसित मोदी म्हणाले..
Just Now!
X