News Flash

‘गेंदा फूल’वर जॅकलिनचा भन्नाट डान्स; पाहा ‘हा’ व्हिडीओ

जॅकलिनचा हा डान्स पाहिलात का?

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कायम ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. जॅकलिन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा जॅकलिनने शेअर केलेल्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. सध्या तिच्या अशाच एका डान्सची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

लॉकडाउनमुळे सलमान खानच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या फार्महाऊसवर अडकलेली जॅकलिन सध्या सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. यातच सोशल मीडियावर तिच्या एका जुन्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बादशहाच्या ‘गेंदा फूल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

बादशहाचं ‘गेंदा फूल’ हे गाणं तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असून त्यावर थिरकण्याचा मोह जॅकलिनलाही आवरला नाही. तिने साडीमध्ये या गाण्यावर भन्नाट डान्स केला. सध्या या गाण्याला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. आतापर्यंत साडेचार लाख लोकांनी जॅकलिनचा हा व्हिडीओ पाहिला आहे. गेंदा फूल हे गाणं विशेष लोकप्रिय असून सध्या टिकटॉकवरदेखील हे गाणं चांगलंच गाजताना दिसून येतं.

दरम्यान, अलिकडेच जॅकलिनचा ‘मिसेस सीरिअल किलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जॅकलिनने ‘अलादिन’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुखने स्क्रीन शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:49 pm

Web Title: jacqueline fernandez dance on badshah song genda phool ssj 93
Next Stories
1 “आधी त्या पैशांचा हिशोब द्या”; आयनॉक्सला दिग्दर्शकाने विचारला जाब
2 ‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो
3 रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X