करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. सर्व सरकारी यंत्रणा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. करोना महामारीच्या काळात गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येऊन लोकांच्या मदतीसाठी धडपड करताना दिसत आहेत. कुणी सोशल मीडियावर उपयुक्त माहिती शेअर करत आहे, तर कुणी ऑक्सिजन सिलेंडर्स मिळवून देत आहे. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील पुढाकार घेतलाय. तिने एका फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्या माध्यमातून ती लाखो लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे. आता ती जनावरांच्या देखील मदतीला धावून आली आहे.

जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकताच एका फाउंडेशनची सुरुवात केली. या फाउंडेशनचे नाव ‘यू ओनली लिव वन्स’ असे आहे. जॅकलीनने स्थापन केलेले ‘यू ओनली लिव वन्स’ (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. आता तिच्या या फाउंडेशनने मुक्या जनावरांना मदत केली आहे.

जॅकलीनने नुकताच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली, ज्याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जे भटक्या जनावरांची सहाय्यता करतात.

आपल्या YOLO फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, जॅकलीनने नुकताच रोटी बँक फाउंडेशनचा दौरा केला. जॅकलीनने मुंबई पोलीस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले होते. आत तिने या कठीण काळात भटक्या जनावरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.