27 January 2021

News Flash

“सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

बॉलिवूड फसवणूक असल्याचं कोणी सांगितलं? अभिनेत्याचा जॅकलीनला सवाल

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर निशाणा साधला आहे. सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यावर तिला बॉलिवूड म्हणजे फसवणूक असल्याची जाणीव झाली, असं म्हणत त्याने जॅकलीनची खिल्ली उडवली आहे.

अवश्य पाहा – “पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने समिक्षकांना दिली होती धमकी

नेमकं प्रकरण काय आहे?

जॅकलीन फर्नांडिसने अलिकडेच बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं होतं. “जगातील सगळ्यात सुंदर फसवणूक म्हणजे कलाविश्व आहे. गेल्या १० वर्षांपासून मी इथे आहे. इथे आम्ही जे करतो ते खरं नसतं. एक कालाकार म्हणून आम्ही जे काम करतो तो फक्त एक दिखावा असतो.” असं म्हणत तिने बॉलिवूडमध्ये घराणेशाही नसल्याचा दावा केला होता. तिच्या या प्रतिक्रियेवर कमाल खानने निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – टायगरच्या बहिणीनं मादक अदांनी अनेकांना केलं घायाळ; सेलिब्रिटीही झाले फिदा

“सलमानच्या फार्म हाऊसमध्ये तीन महिने राहिल्यावर जॅकलीनला बॉलिवूड म्हणजे फसवणूक असल्याची जाणीव झाली. बॉलिवूड फसवणूक असल्याचं तिला कोणी सांगितलं? सलमानने? तो तर स्वत:लाच बॉलिवूड समजतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खानने जॅकलीनची खिल्ली उडवली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 8:07 pm

Web Title: jacqueline fernandez kamaal r khan salman khan bollywood is fake mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
2 आलियाचा फोटो पाहून कंगना संतापली; दीपिका-रणवीरवर साधला निशाणा
3 ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला जगायचंय फिल्मी स्टाइलमध्ये जीवन
Just Now!
X