News Flash

अदाकारीने मनोरंजन करणारी जॅकलीन फर्नांडिस लोकांची भूक मिटवणार; ‘योलो’ फाऊंडेशनची केली स्थापना

लाखो लोकांपर्यंत जेवण पोहचवणार

करोना महामारीच्या काळात गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येऊन लोकांच्या मदतीसाठी धडपड करताना दिसत आहेत. कुणी सोशल मीडियावर उपयुक्त माहिती शेअर करतंय, तर कुणी ऑक्सिजन सिलेंडर्स मिळवून देतंय. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने देखील पुढाकार घेतलाय. करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने एका संस्थेची स्थापना केली असून लाखो लोकांपर्यंत ती जेवण पोहोचवणार आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीय. दिलखेचक अदा आणि घायाळ करणारं अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा तिने सर्वांची मनं जिंकली आहेत. देशात सुरू असलेल्या करोना संकटात ज्याप्रमाणे औषधांची आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय, त्याचप्रमाणे खाण्यासाठी अन्नाची देखील कमतरता जाणवत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून नेहमीच रूपेरी पडद्यावर अभिनयाने आपलं मनोरंजन करणारी जॅकलीन आला गरीबांचे पोट भरवणार आहे.

यासाठी तिने योलो (YOLO) नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे. यासाठी ती वेगवेगळ्या संस्थाची मदत घेऊन करोना काळात तळागळापर्यंत जाऊन लोकांची मदत करणार आहे. तिच्या या संस्थेचा लोगो नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. लोगो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “आपल्याला एकदाच जगण्याची संधी मिळते.. जे जे आपण करू शकतो ते सर्व आपण आपल्या समाजासाठी केलं पाहीजे…म्हणूनच मला आज ‘YOLO’ फाऊंडेशनची घोषणा करताना अभिमान वाटतोय…समाजोपयोगी काम करण्यासाठीचं आणि चांगुलपणाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं पहिलं पाऊल..या कठीण काळात आम्ही अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत करार केला आहे..जे जे आमच्याकडून शक्य आहे ते सर्व आम्ही करण्याचा प्रयत्न करू…”.

अधिक सांगायचं झालं तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने ‘रोटी बॅंक’ नावाच्या संस्थेची मदत घेऊन १ लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार आहे. त्याचप्रमाणे ‘फीलाईन फाऊंडेशन’सोबत करार करत रस्त्यांवरील १ हजार भटक्या जनावरांसाठी काम करणार आहे. तसंच करोना काळात फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना, मुंबई पोलिसांना मास्क आणि सॅनिटाझरचे देखील वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलंय. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या तासाभरातच दिड लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोबतच कमेंट्स अक्षरशः पाऊस पाडत तिच्या उपक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर यंदाच्या वर्षी ती लागोपाठ एका मागोमाग एक फिल्ममध्ये झळकणार आहे. तिच्या आगामी ‘भूत पुलिस’ नावाच्या फिल्ममध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात देखील ती दिसणार आहे. यात ती एक्स गर्लफ्रेंडची भूमिका करणार आहे. सोबतच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ मध्ये ती अभिनेता रणवीर सिंह सोबत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 11:24 am

Web Title: jacqueline fernandez launches yolo foundation during covid 19 share post on instagram prp 93
Next Stories
1 लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर मैत्रिणीने केला खुलासा
2 फॅशन डिझाइनर्सने कंगनासोबत करार तोडल्यानंतर बहिण रंगोली संतापली; “हे छोटे डिझायनर..”
3 आमिरच्या अफेअरवर प्रश्न विचारताच सलमानने दिलं मजेशीर उत्तर
Just Now!
X