23 September 2020

News Flash

‘या’ कारणामुळे जॅकलीन सलमानच्या फार्म हाऊसवरुन मुंबईला परतली…

कारण ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत होती. तेथे ती तिचे छंद जोपासत होती. तसेच जॅकलिनने ती दररोज करत असलेल्या कामांवर आधारित एक शॉर्ट फिल्म देखील बनवली होती. पण आता जॅकलिन अचानक मुंबईला परतल्याचे समोर आहे. जॅकलिन अचानक पनवेलच्या फार्म हाऊसवरुन मुंबईला का परतली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार जॅकलिनची जवळची मैत्रीण लॉकडाउनमुळे मुबंईत एकटी राहत होती. त्या दोघीही खास मैत्रीणी आहेत आणि त्यांचे नेहमी बोलणे होत असत. जेव्हा जॅकलिनला तिची मैत्रीण मानसिक तणावात आहे हे कळाले तेव्हा ती तातडीने पनवेलहून मुंबईला रवाना झाली. तसेच जॅकलिन या कठिण काळात तिच्या मैत्रीणीसोबत राहणार आहे. जॅकलिनच्या निर्णयाने अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

The time is now

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. अशातच आपल्या मैत्रीणीच्या मदतीसाठी जॅकलिनने हा निर्णय घेतला आहे. जॅकलिनने सलमानच्या फार्म हाऊसवर दोन म्यूझिक अल्बमचेही शूट केले. ज्यामध्ये ती सलमानसोबत दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:52 pm

Web Title: jacqueline fernandez leaves salman khans panvel farmhouse avb 95
Next Stories
1 ‘त्याने प्रपोज केलं पण, नंतर…’; रिचा-अलीची Lovestory
2 ‘रिलेशनशिप स्टेटस’ विचारणाऱ्या चाहत्याला इलियानाचं भन्नाट उत्तर
3 “…तेव्हा आत्महत्येचाही विचार डोक्यात आला”; करोनाबाधित अभिनेत्रीने सांगितला अनुभव
Just Now!
X