News Flash

जॅकलिन साकारणार अझरुद्दीनची बेगम?

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर 'किक' चित्रपटात काम केल्यापासून श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिसचे भाग्य खुलले असून...

| January 27, 2015 01:24 am

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर ‘किक’ चित्रपटात काम केल्यापासून श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिसचे भाग्य खुलले असून, सध्या तिच्याकडे काही चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘रॉय’ चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणारी जॅकलिन माजी क्रिकेटपटू मोहंम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटात अझरुद्दीनची बायको संगीता बिजलानीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेत्री करिना कपूरशी संपर्क साधण्यात आल्याचेदेखील बोलले जाते. परंतु, या चित्रपटाऐवजी करिनाने ‘उडता पंजाब’ चित्रपट स्वीकारणे पसंत केले. ११९६ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या अझर आणि संगीताचा २०१० साली घटस्फोट झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 1:24 am

Web Title: jacqueline fernandez likely to play mohammad azharuddins wife sangeeta bijlani
Next Stories
1 सगळे टाळ्या वाजवणार?
2 सीआयडीचे शिलेदार
3 बाळासाहेब.. आवाजरूपातील!
Just Now!
X