भारतात दिवसेंदिवस नेटफिक्सचे क्रेझ वाढत चालले आहे. अनेक जाण नेटफिक्सवरील सीरिज पाहात असतात. तसेच नवनव्या सीरिजची वाट देखील पाहात असतात. सीरिजसह नेटफिक्सवर अनेक चित्रपट देखील प्रदर्शित होतात. आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस देखील नेटफिक्स ओरिजनल चित्रपटात काम करणार आहे. तिने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.

‘मला हे सांगण्यास आनंद होत आहे की माझा नेटफिक्स ओरिजनल चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव मिसेस सीरियल किलर आहे. मी या चित्रपाटासाठी फार उत्सुक आहे’ असे जॅकलीनने ट्विट केले आहे. जॅकलीनचा मिसेस सीरियल किलर हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती फराह खान करणार असून दिग्दर्शन फराहचे पती शिरीष कुंदर करणार आहे. शिरीष कुंदरने याआधी १८ मिनिटांचा लघूपट केला होता. या लघूपटाचे नाव ‘क्रिती’ असे होते. तसेच त्यामध्ये राधिका आपटे, नेहा शर्मा आणि मनोज वाजपेयी यांनी मुख्य भूमिका निभावली होती.

यापूर्वी जॅकलीनने अभिनेता सुरज पांचोली सह ‘जीएफ बीएफ’ हा म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला होता. या म्युझिक व्हिडिओची निर्माती भूषण कुमारने केली असून रेमो डिसूझानी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर ‘हाऊसफुल-३’ चित्रपटातील टांग उठाके’ गाण्यावर टॅप डान्स केला होता. या डान्सने जॅकलीनने अनेकांची मनं जिंकली होती. तसेच जॅकलीनचे पोल डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.