18 January 2019

News Flash

Video : जॅकलीनच्या ‘या’ व्हिडिओला मिळाले कोट्यावधी व्ह्युज

या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच लोकांच्या मनात घर केल्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल यात शंका नाही.

जॅकलीन फर्नांडिस

सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. हा वाढता आलेख थांबायचं नाव घेत नसून आतापर्यंत तीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच सुपरहिट यादीत समावेश करता येईल असा तिचा आगामी ‘रेस ३’  हा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच लोकांच्या मनात घर केल्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल यात शंका नाही.  ‘रेस ३’मध्ये जॅकलीन काही साहसदृश्य करताना दिसून येणार असून याच पार्श्वभूमीवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जॅकलीनने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले असून अल्पावधीमध्येच तो लोकप्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये जॅकलीन साहसदृश्यांचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. जॅकलीनने या व्हिडिओत केलेली साहसदृश्ये चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्याला आतापर्यंत १ कोटींच्यावर व्ह्युज मिळाले आहेत.

 

दरम्यान, ‘रेस ३’ चित्रपटामध्येदेखील जॅकलीनने अशाच प्रकारची काही साहसदृश्य केली असून ही दृश्ये करताना तिच्या डोळ्यांना दुखापतही झाली होती. या दुखापतीची माहिती जॅकलीनने फोटो शेअर करुन दिली होती.जॅकलीनचा ‘रेस ३’  हा येत्या १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शहा, साकिब अली यांसारखे कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत.

First Published on June 13, 2018 3:44 pm

Web Title: jacqueline fernandez race 3 action scenes video viral