23 January 2021

News Flash

जॅकलिन म्हणते लॉकडाउनच्या काळात समजतंय आयुष्य अगदीच…

जॅकलिनने बोलून दाखवल्या मनातल्या भावना

“लॉकडाउनच्या काळात समजतंय आयुष्य अगदीच छोटं आहे.. असं म्हणत जॅकलिन फर्नांडीसने तिच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. सध्याच्या काळात आयुष्यातला एक मोठा धडा आपण शिकतो आहोत. आयुष्य अगदीच छोटं आहे असं जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे. आपण या पृथ्वीवर जन्माला आलो आहे हे आपलं भाग्य आहे. मात्र आपण आपल्या पृथ्वीला गृहित धरतो. त्यामुळे आपल्याला करोनासारख्या संकटाला सामोरं जावं लागतंय. आज लॉकडाउनच्या काळात समजतं आहे की आयुष्य किती छोटं आहे” असंही जॅकलिनने म्हटलं आहे.

जॅकलिन लॉकडाउनमुळे अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर अडकून पडली आहे. या काळात आपल्याला काय काय वाटतं त्याबद्दल तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या आपल्या हाती असलेला काळ हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे असंही जॅकलिनने म्हटलं आहे. फ्री प्रेस जनरलने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जॅकलिन फर्नांडीस आणि मनोज वाजयपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेला मिसेस सीरियल किलर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच NETFLIX वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा जॅकलिनने तिच्या समर्थ अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सध्या सलमान खान याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जॅकलिन तिचा वेळ घालवते आहे. घोडेस्वारी, वाचन यांसारख्या छंदाना ती वेळ देते आहे. लॉकडाउनच्या काळातच जॅकलिनने एक शॉर्ट फिल्मही चित्रीत केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 4:20 pm

Web Title: jacqueline fernandez says lockdown has made her realise life is short scj 81
Next Stories
1 प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केल्यानंतर मिळाले ५०० रुपये आणि प्रमाणपत्र, अभिनेत्री म्हणते..
2 “एक्स गर्लफ्रेंड्सची नावं ऐकून पत्नी संतापते”; जस्टिन बीबरने सांगितला अनुभव
3 ‘एक सॅल्यूट तो मार’; पोलिसांसाठी जितेंद्र जोशीचं खास रॅप साँग
Just Now!
X