14 October 2019

News Flash

जॅकलिनचा टिकटॉक व्हिडिओ पाहिलात का?

या व्हिडिओमध्ये जॅकलिनसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्टर देखील दिसत आहे

फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिकटॉकचे वेड लागले आहे. तसेच संपूर्ण देशात सध्या टिकटॉकचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. टिकटॉकचा व्हिडियो बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याला बॉलिवूड कलाकार देखील अपवाद नाहीत. त्यातील एक म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने नुकताच एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्टर देखील दिसत आहे. मिकी आणि जॅकलिनने व्हिडिओमध्ये जोक सांगितला असून ते दोघे त्यावर हसत आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत जॅकलिनने माफी देखील मागितली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफआन व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला आहे.

या व्हिडिओमध्ये जॅकलिन ‘कपिल शर्मा शो’मधील लोकप्रिय पात्र बच्चा यादवचा एक जोक सांगत आहे. दरम्यान जॅकलिन खूप चांगल्या प्रकारे लिप सिंक करताना देखील दिसत आहे. जॅकलिनच्या या जोकवर मिकी देखील मनापासून हसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना ‘मिकी तुझासोबत असे केल्याबद्दल माफी असावी’ असे लिहिले होते.

जॅकलिन लवकरच एका नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपटात काम करणार आहे. तसेच या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. तिने या नेटफिक्स चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. आता चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.

First Published on May 16, 2019 11:30 am

Web Title: jacqueline fernandez shares tik tok video on social media