29 September 2020

News Flash

Video : सलमानच्या फार्महाऊसवर जॅकलिनने शूट केली शॉर्ट फिल्म

यामध्ये जॅकलिनने सलमानच्या फार्महाऊसवर काम करणारे लोक देखील दाखवले आहेत.

सध्या लॉकडाउनमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सलमान खानच्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत आहे. तेथे ती तिचे छंद जोपासताना दिसत आहे. तसेच आता जॅकलिनने ती दररोज करत असलेल्या कामांवर आधारित एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. तिची ही फिल्म चाहत्यांना आवडली आहे.

नुकताच जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही शॉर्ट फिल्म शेअर केली आहे. ही शॉर्ट फिल्म सध्या ती सलमानच्या फार्म हाऊसवर काय काय कामे करते यावर आधारित आहे. ही फिल्म जॅकलिनने स्वत: शूट केली आहे. या ३. ४८ मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये जॅकलिनने फार्महाऊसवर काम करणाऱ्या लोकांना देखील दाखवले आहे. तसेच जॅकलिन तेथे पुस्तक वाचते, हॉर्स रायडिंग करते, स्वत:चे कपडे धूवून वाळत घालताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

@jacquelinef143

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

पाहा : सलमान राहत असलेला पनवेलचा आलिशान फार्महाऊस पाहिलात का?

तसेच या शॉर्ट फिल्मवरुन जॅकलिन तिचा संपूर्ण वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवत असल्याचे दिसत आहे. सलमानच्या फार्महाऊसवर कुत्रे, मांजर, कोंबड्या, म्हशी असल्याचे दिसत आहे. तसेच अनेक फळझाडे देखील आहेत. जॅकलिनचा हा व्हिडीओ सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 5:03 pm

Web Title: jacqueline fernandez shoots short film inside salman khan panvel farmhouse avb 95
Next Stories
1 “…म्हणून मोदींनी देशाला ७० वर्षे मागे नेलं”; अभिनेत्याचा टोला
2 विकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’
3 रामायणानंतर ‘उत्तर रामायणा’चा विक्रम
Just Now!
X