बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणती अभिनेत्री कोणाला डेट करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यातच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने ती कोणाला डेट करते याचा खुलासा केला आहे. आता चाहत्यांमध्ये जॅकलिनच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

नुकताच ‘इटाईम्स’ने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये जॅकलिनला ती सिंगल आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जॅकलिनने हास्यस्पद उत्तर दिले आहे. ‘मी माझ्या मांजरीला डेट करते. माझ्या कडे चार मांजर आहेत. तिचा पती आणि त्यांची दोन मुले देखील आहेत. आता हेच माझे कुटुंब आहे’ असे उत्तर तिने दिले आहे. जॅकलिनच्या या उत्तरावरुन एकंदरीत ती सिंगल असल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
nitin gadkari latest news (1)
Video: “आज गावागावांत गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहे”, नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “विकास झालाय, पण…!”
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

जॅकलिनचे तिच्या मांजरींवर प्रचंड प्रेम आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मांजरींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. दरम्यान हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरले झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये जॅकलिन प्रसिद्ध डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्टरसह मस्ती करताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये जॅकलिन ‘कपिल शर्मा शो’मधील लोकप्रिय पात्र बच्चा यादवचा एक जोक सांगत आहे. सध्या जॅकलिना ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेक आणि ‘किक २’ या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.