25 November 2020

News Flash

जॅकलिनला बनायचं होतं नन, पण झाली अभिनेत्री; कारण….

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिंस सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिंस सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी जॅकलिन कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर लहानपणी तिला नन बनायचे होते या आवाक् करणाऱ्या खुलाशामुळे चर्चेत आहे.

जॅकलिनने अलिकडेच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने आपल्या आयुष्यातील अनेक गंमतीदार प्रसंग सांगितले. तिला लहान असताना अभिनेत्री नव्हे, तर नन बनायचे होते. परंतु तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली त्यानंतर तिने आपला विचार बदलला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

काय म्हणाली जॅकलिन?

“लहान असताना मला नन होण्याची इच्छा होती. कारण मी एका मिशनरी शाळेत शिकत होते. ही शाळा फक्त मुलींचीच होती. त्यावेळी अभ्यास करणे व चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे या दोन कामांमध्येच आमचा दिवस संपून जायचा. त्यावेळी चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या नन पाहून मला मोठेपणी त्यांच्यासारखेच होण्याची इच्छा होत असे. परंतु त्यानंतर एके दिवशी एका आंतरशालेय गाण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा मुलांना पाहिले. एकाच वेळी अनेक मुले पाहाण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग होता. त्यावेळी पहिल्यांदा मुलांशी मैत्री करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मैत्री करण्यासाठी मी मुलांचा शोध घेऊ लागले. पुढे मुलांचा शोध घेत असताना माझी नन होण्याची इच्छा कुठल्या कुठे नाहीशी झाली.” असे जॅकलिन ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 4:35 pm

Web Title: jacqueline fernandez wanted to be a nun before she discovered boys mppg 94
Next Stories
1 पानिपत: अहमद शाह अब्दालीसाठी गोवारीकरांनी संजय दत्तच का निवडला?
2 ‘मै पॉर्न चाहती हूँ’, जाणून घ्या असे का म्हणाली अनन्या पांडे
3 काय आहे उत्कर्ष शिंदेच्या सुपरहिट गाण्यामागचे गुपित?
Just Now!
X