News Flash

जॅकलिनला हवाय ‘जुडवा २’

या सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल. हा सिनेमा मिळण्यासाठी मी फार आशावादी आहे

सध्या बॉलिवूडमध्ये जॅकलिनचं नशिब चांगलंच फळफळतंय. ‘हाऊसफूल ३’ आणि ‘ढिशूम’ या दोन्ही सिनेमांच्या घवघवीत यशामुळे सध्या ती चांगलीच खुष आहे. आता तिचा टायगर श्रॉफ बरोबरचा ‘अ फ्लाईंग जट’ हा सिनेमा येत आहे. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत एक अॅक्शनपॅक्ट सिनेमातही दिसणार आहे. सिद्धार्थबरोबरच्या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर जॅकलिन वरुण धवनसोबतही एक सिनेमा करणार आहे. वरुणसोबत ती ‘एबीसीडी ३’ मध्ये दिसणार आहे अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरु आहे.
पण, जॅकलिनने या गोष्टीला नकार देत. ‘एबीसीडी ३’ साठी मला अजून विचारण्यात आलेले नाही असे कबूल केले. वरुण मात्र या सिनेमात दिसेल हे नक्की झाले आहे. ‘जुडवा २’ मध्येही जॅकलिनची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावर ती म्हणाली, ‘या सिनेमात काम करायला कोणाला आवडणार नाही, हा सिनेमा मिळण्यासाठी मी फार आशावादी आहे त्यासाठीच मी ‘फिंगर क्रॉस’ केले आहेत.’ या सिनेमांशिवाय सुशांतसिंग राजपुतबरोबरही ती एक सिनेमा करणार आहे. या सिनेमाचं अजून नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
सध्या सुशांत त्याच्या आगामी ‘एम.एस.धोनीः अनटोल्ड स्टोरी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे जॅकलिनही ‘द फ्लाईंग जट’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सगळ्यांमधून त्या दोघांना वेळ कधी मिळणार आणि पुढच्या सिनेमाची बोलणी कधी होणार ते त्यांचं त्यांनाच माहित.

‘ए फ्लाईंग जट’मधूनही अरिजित बाहेर…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:17 pm

Web Title: jacqueline fernandez wants to act in upcoming judwa 2 movie
Next Stories
1 ..आणि रणवीर सिंगने मारली आकाशातून उडी
2 रक्षाबंधन विशेषः मला कधीच भावाची कमतरता जाणवली नाही- सई ताम्हणकर
3 रक्षाबंधन विशेषः मीच माझ्या भावाला गिफ्ट देते- संस्कृती बालगुडे
Just Now!
X