News Flash

‘जादू की झप्पी’ गाणे संजय दत्तशी जोडलेले – जॅकलीन

प्रभूदेवाचे निर्देशन असणा-या 'रमैया वस्तावैया' चित्रपटातील 'जादू की झप्पी' या आयटम सॉंगवर थिरकणा-या जॅकलीन फर्नांडीझला या गाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाण्याची आशा आहे.

| July 2, 2013 01:15 am

प्रभूदेवाचे निर्देशन असणा-या ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटातील ‘जादू की झप्पी’ या आयटम सॉंगवर थिरकणा-या जॅकलीन फर्नांडीझला या गाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाण्याची आशा आहे. या गाण्याचे बोल हे संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या ‘जादू की झप्पी’ या प्रसिद्ध ओळीने प्रेरित असल्याचे गाण्याच्या अनावरणावेळी जॅकलीनने सांगितले.
जॅकलीन म्हणाली की,’जादू की झप्पी’ हे वाक्य संजय दत्त यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहे. त्याचाच आम्ही गाण्यात वापर केला असून प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग आवडेल. मी असे गाणे यापूर्वी न केल्यामुळे माझ्या मनात फार भीती होती. पण, गाणे ऐकल्यावर ते मला आवडले आणि प्रभूदेवासोबत नृत्य करण्याची संधी न गमवता हे आयटम सॉंग करण्याचा मी निर्णय घेतला. सदर गाण्याकरिता जॅकलीनने सात दिवस सराव केला होता. ऐश्वर्या राय बच्चनचे ‘कजरारे’ हे आयटम सॉंग जॅकलीनला आवडते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:15 am

Web Title: jadoo ki jhappi belongs to sanjay dutt jacqueline fernandez
Next Stories
1 पुढील तीन वर्षात गोव्यात येणार फिल्मसिटीः गोवा राज्य सरकार
2 ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत
3 बंगाली साहित्यावर चित्रपट करण्यास मधुर भांडारकर उत्सुक
Just Now!
X