News Flash

रणबीरचे शाळेतील खोडकर रुप सर्वांसमोर उघड

फोटोमागे दडला आहे रणबीरचा अनोखा चेहरा

छाया सौजन्य- ट्विटर

अभिनेता रणबीर कपूरचा एक फोटो पोस्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. ‘जग्गा जासूस’ या त्याच्या आगामी चित्रपटातील एक फोटो यु टीव्ही मोशन पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या क्षणचित्रमध्ये रणबीर शाळकरी मुलाच्या रुपात दिसत आहे. वसतीगृहातील उपहारगृहात रणबीर त्याच्या मित्रांसह कल्ला करताना दिसतोय. हिरव्या रंगाचे स्वेटर, गुडघ्यापर्यंतची पॅन्ट त्याच्यावर शोभून दिसत आहे.

याआधीही ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातील काही क्षणचित्रे सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली होती. पण, त्या सर्व फोटोंपैकी रणबीरच्या या फोटोला जास्त पसंत केले जात आहे. हा चित्रपटामध्येही प्रेक्षकांना रणबीरचे अभिनय कौशल्या पाहता येणार असून तो यात एका किशोरवयीन गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. आपल्या वडिलांच्या शोधात आलेल्या एका मुलाची भूमिका रणबीर साकारतोय. रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अदा शर्मासुद्धा झळकणार आहेत.

अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि कतरिना आमनेसामने आले आहेत. त्यांच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. रणबीर आणि कतरिना कैफ यांनी ब्रेकअपनंतरही या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये अडथळे येऊ दिले नाहीत. दरम्यान, अनुराग बासू सोबत रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटामध्ये काम केले होते. ‘जग्गा जासूस’ नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अनुराग बासू प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जीवनावर बनणाऱ्या एका चित्रपटासाठीदेखील एकत्र काम करणार आहेत.

दरम्यान, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयासाठी सध्या त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. बऱ्याच काळानंतर रणबीरच्या वाट्याला या चित्रपटाच्या निमित्ताने यश आले. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही झेप घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:01 pm

Web Title: jagga jasoos ranbir kapoor looks like schools most naughty kid in latest still see pic
Next Stories
1 ..म्हणून आलिया म्हणाली ‘जस्ट गो टू हेल’
2 ..अन् सनीच्या मदतीला धावला आमिर खान
3 माझा पार्टनर हॉट नसला तरी चालेल- आलिया भट्ट
Just Now!
X