News Flash

रणबीर-कतरिनाच्या मध्ये येणारा ‘तो’ तिसरा शाहरुख तर नाही ना?

शाहरुख आणि रणबीर हे एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जातेय.

रणबीर आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेला 'जग्गा जासूस' ७ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होईल.

दिग्दर्शक संजय लीला भन्साली याच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरु आहे. नुकतीच या चित्रपटाच्या सेटवर ‘डिअर जिंदगी’च्या निमित्ताने शाहरुख आणि आलियाने भेट दिली होती. त्यानंतर आता शाहरुखने अनुराग बसूच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या सेटवर भेट दिली. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडच्या किंग खानने अचानकपणे ‘जग्गा जासूस’च्या सेटला भेट दिली.

विशेष म्हणजे, शाहरुख त्याचे मित्र अनुराग बसू आणि रणबीर यांना भेटण्यासाठी गेला होता की यामागे काही वेगळे कारण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, ‘जग्गा जासूस’मध्ये शाहरुख पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार असल्याची चर्चा आता चित्रपटवर्तुळात सुरु झाली आहे. जर हे खरं असेल तर यावर्षी शाहरुख दुस-यांदा ज्युनिअर कपूर म्हणजेच रणबीरच्या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसेल. तसेच, तो या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारणार याबाबतही त्याच्या चाहत्यांना उत्सुकला लागली असेल. याआधी शाहरुखने ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात ऐश्वर्याच्या पूर्व पतीची भूमिका साकारली होती. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रणबीर त्याच्या बेपत्ता वडिलांचा शोध घेताना दिसेल. तसेच, यात कतरिना कैफ आणि अदा शर्मा यांच्याही भूमिका आहेत. रणबीर आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेला ‘जग्गा जासूस’ ७ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होईल.

दरम्यान, बादशहा शाहरुख खान आणि रणबीर कपूर हे एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जातेय. रशियन निर्माता अॅलेक्से पेट्रूहिन याच्या ‘वीआयवाय: जर्नी टू इंडिया’ या चित्रपटात हे दोन्ही भारतीय कलाकार काम करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अॅलेक्से याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शाहरुख आणि रणबीरशी संपर्क साधल्याचे कळते. अॅलेक्सेने इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही शाहरुखला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आणि सह निर्माता म्हणून विचारणा केली आहे. त्याच्याकडून आता होकार येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. चित्रपटासाठी आम्ही रणबीरचीही निवड केली असून त्यालाही विचारणा केली आहे. आम्हाला रणबीर आणि शाहरुखला चित्रपटात एकत्र आणायचे आहे. अॅलेक्से याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शाहरुख आणि रणबीरशी संपर्क साधल्याचे कळते. अॅलेक्सेने इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही शाहरुखला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आणि सह निर्माता म्हणून विचारणा केली आहे. त्याच्याकडून आता होकार येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. चित्रपटासाठी आम्ही रणबीरचीही निवड केली असून त्यालाही विचारणा केली आहे. आम्हाला रणबीर आणि शाहरुखला चित्रपटात एकत्र आणायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 5:19 pm

Web Title: jagga jasoos shah rukh khan to do a cameo in ranbir kapoor katrina kaif film
Next Stories
1 घटस्फोटासाठी अरबाज- मलायकाने गाठले न्यायालय
2 ..असा असेल ‘पद्मावती’चा क्लायमॅक्स?
3 ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्कार
Just Now!
X