News Flash

सलमानच्या ‘जय हो’ला प्रसिद्धीचा मुहूर्त सापडला!

पळा..पळा..कोण पुढे पळे तो.. या बॉलिवूडच्या स्पर्धेत सलमान खान गेले वर्षभर मागे पडला होता. त्यामुळे यावर्षीचा शुभारंभ आपल्याच

| December 7, 2013 12:45 pm

पळा..पळा..कोण पुढे पळे तो.. या बॉलिवूडच्या स्पर्धेत सलमान खान गेले वर्षभर मागे पडला होता. त्यामुळे यावर्षीचा शुभारंभ आपल्याच चित्रपटाने करायचा हे ठरवूनच सलमान आणि सोहेल ‘खान’ बंधू कामाला लागले. मात्र, चित्रिकरण लांबत गेल्यामुळे सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटाला प्रसिध्दीसाठी उसंतच सापडत नव्हती. बॉलिवूडच्या प्रसिध्दी नियमांनुसार चित्रपट प्रदर्शित व्हायच्या किमान एक ते दोन महिने आधी त्याच्या प्रसिध्दी कार्यक्रमांना सुरुवात होते. ‘धूम ३’साठी तर यशराजने चार ते पाच महिने आधीपासून सुरुवात केली होती. मात्र, अखेर सलमानला आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी मुहूर्त सापडला असून कमीतकमी वेळात प्रभावी प्रसिध्दी करण्यासाठी तो अभिनव मार्ग चोखाळणार आहे. सोहेल खान दिग्दर्शित करत असलेल्या ‘जय हो’चे चित्रिकरण काही ना काही कारणांमुळे सतत लांबले गेले. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शनचे सोपस्कार पूर्ण करून चित्रपटाच्या प्रसिध्दीचे नियोजन करायला निर्मात्यांकडे वेळच उरलेला नाही. मात्र, गेले वर्षभर चित्रपटांपासून लांब राहिलेल्या सलमानला काहीही करून ‘जय हो’ साठी पध्दतशीर नियोजन आवश्यक आहे. एकतर गेल्या वर्षभरातील त्याची अनुपस्थिती ‘खाना’ वळीतील इतरांना आणि अगदी सलमानच्याच भाषेत सांगायचे तर ‘कल का छोकरा’ असलेल्या रणबीरलाही चांगलीच फळली. त्यात ‘जय हो’मध्ये सलमानबरोबर डेझी शाह आणि सना खान या दोन नवीन अभिनेत्री, तब्बू अशी मोजकीच नावे असली तरी सलमान वगळता यातले कुठलेच नाव ‘हमखास यशस्वी’ शिक्का असलेले नाही. त्यामुळे ‘जय हो’चा संपूर्ण डोलारा सलमानवर असल्या कारणाने ‘दबंग’ खानला यावेळी आपल्या चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी करावीच लागेल, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.सलमाननेही ते मनावर घेतले असून पुढच्याच आठवडय़ात ‘जय हो’चा ट्रेलर लॉंच करण्यात येणार आहे. मात्र, कमीतकमी वेळात लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवायचा असल्याकारणाने नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद वगैरे न घेता थेट चाहत्यांना आवाहन करण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. जुहू येथील ‘चंदन’ चित्रपटगहात सलमानच्या चाहत्यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मग सलमान ‘भाई’चे चाहते ठरवतीलच पुढच्या वर्षी भाईला ‘जय हो’ करायचे की नाही ते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 12:45 pm

Web Title: jai hos first look is out peoples man salman khan thanks fans
टॅग : Bollywood,Salman Khan
Next Stories
1 आमिर खान होणार आजोबा
2 धूम ३ : आमिरचे ‘बॉडी-पेन्ट’
3 बॉलिवूडची ‘जासूसी..’
Just Now!
X