21 April 2019

News Flash

Jalebi trailer: प्रेमाचा गोडवा जपणाऱ्या ‘जलेबी’चा ट्रेलर प्रदर्शित

'जलेबी'च्या पोस्टरची कल्पना चोरल्याचा आरोप महेश भट यांच्यावर करण्यात आला होता.

‘जलेबी : द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह’चा ट्रेलर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसापासून दिग्दर्शक महेश भट यांच्या ‘जलेबी : द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. मात्र या पोस्टरची कल्पना चोरल्याचा आरोप महेश भट यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाची खूप चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या चर्चांनंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘जलेबी : द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चाहत्यांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या ट्रेलरला ८२ लाखापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि वरुण मित्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या ट्रेलरमध्ये प्रेम, ड्रामा या साऱ्यांचा भरणा केल्यांच पाहायला मिळत आहे. दिल्ली फिरायला आलेल्या मुंबईतील एका मुलीची (रिया चक्रवर्ती)ही कथा असून दिल्ली फिरविण्यासाठी तिला गाईड करणाऱ्या मुलाच्याच (वरुण मित्रा)ती प्रेमात पडते. त्यानंतर या दोघांच लग्न होत आणि पहिल्यांदाच सासरी गेलेली ही मुलगी साडी किंवा लेहंगा न घालता चक्क वेस्टर्न आऊटफिटमध्ये गेल्याचं दिसून येतं. त्यानंतर काही कारणास्तव या जोडीमध्ये लहान लहान खटके उडतात आणि एका क्षणाला या दोघांना वेगळं व्हावं लागतं असं या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे.

महेश भट आणि मुकेश भट यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये निर्मिती झालेला हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

First Published on September 11, 2018 11:43 am

Web Title: jalebi official trailer rhea chakraborty varun mitra