बॉलिवूड स्टार असो किंवा टीव्ही कलाकार, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या छोट्यात छोटी गोष्ट त्यांच्या चाहत्यांना माहित असते. चाहत्यांची नजर त्यांनी कोणते कपडे कधी आणि कोणत्या कार्यक्रमात घातले यावरही बारीक नजर असते. कोणत्याही सेलिब्रिटीने एकदा घातलेले कपडे पुन्हा घातले तर चाहत्यांच्या ते लगेच लक्षात येते. टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा तिच्या अनोख्या फॅशन स्टाइलसाठी नेहमीच ओळखली जाते. कपड्यांपासून मेकअपपर्यंत नवनवीन प्रयोग करताना ती दिसते. नुकतेच नियाने कपडे पुनःपुन्हा वापरण्यावर लोकांकडून घेण्यात येणाऱ्या आक्षेपाबद्दल एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे.

https://www.instagram.com/p/BglABJ6lNMA/

झी टीव्हीवरील जमाई राजा मालिकेतील मुख्य अभिनेत्री निया शर्माने ट्विट करत म्हटले की, ‘मी एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरायला घाबरत नाही. त्यात जर ते माझे सर्वात आवडते कपडे असतील तर तुम्ही मला सांगू नका की ते कपडे मी काल वापरले होते.’ नियाच्या या ट्विटचे तिच्या चाहत्यांनी समर्थनच केले. तिच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘म्हणून तू आम्हाला आवडतेस. तू इतर सेलिब्रिटींसारखी नाहीस. एकदा वापरलेले कपडे दुसऱ्यांदा न वापरणं हे मुर्खपणाचं आहे. उगाच दिखावेगिरी केली जाते.’

काही दिवसांपूर्वी निया शर्माला यूकेमधील एका मासिकाने आशियातील सर्वात मादक महिलाचा किताब देऊन गौरविले आहे. असल्याचे म्हटले होते. स्टार प्लसच्या एक हजारों में मालिकेतून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेत तिची दुय्यम भूमिका होती. यानंतर निया जमाई राजा मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे निया घराघरांत पोहोचली. तिने ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.