बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. मात्र जॅमीचा आता कॉमेडी करतानाचा नाही तर डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी, वडिल जॉनी लिव्हर आणि तिचा भाऊ जॅसी लिव्हर दिसत आहेत. या व्हिडीओत ते A – star च्या Don’t touch me या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तयार करण्यात आले आहे. या गाण्यात करोनाच्या भीतीमुळे पटकन एखाद्या व्यक्तीने हात लावलेला आजकाल लोकांना आवडत नाही यावर हे गाण आहे. मात्र या गाण्यात लिव्हर कुटूंबियांचा डान्स पाहून चाहते आनंदी झाले आहेत. या व्हिडीओसोबत सगळ्यांचे लक्ष जॅमीच्या कॅप्शनने वेधले आहे. तर जॉनी लिव्हर यांचे हे पहिलं इन्स्टाग्राम रील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

हा व्हिडीओ जॉनी लिव्हर यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘करोनाची लस घेत नाही तो पर्यंत डोन्ट टच मी’ अशा आशयाचे कॅप्शन जॉनी लिव्हर यांनी व्हिडीओ शेअर करत दिले आहे. जॉनी यांचे हे पहिलं इन्स्टाग्राम रील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Johny Lever (@iam_johnylever)

एवढचं नव्हे तर जॅमीने या आधी तिचा भाऊ जॅसी लिव्हरसोबत व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ते दक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या ‘वाथी कमिंग’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतं होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

२०१२मध्ये जॅमीच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून झाली होती. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हाऊसफुल ४’ मध्ये तिने गिगलीची भूमिका साकारली होती.