06 August 2020

News Flash

ते फकस्त ६०० व्हते…पाहा ‘जंगजौहर’चं नवीन पोस्टर

"श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा...म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला"

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठेशाहीच्या इतिहासातील शूर योद्धांचा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत. या चित्रपटाचा नवीन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक..! पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. अविस्मरणीय पराक्रमाचा हा अध्याय ‘जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातिर्थी पडले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.

View this post on Instagram

"श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला" नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा… 'जंगजौहर', हे आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण… #जंगजौहर #JungJauhar AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar @chinmay_d_mandlekar @ajay.purkar @harishdudhade_official #SunilJadhav @ankittmohan @akshayswaghmare @mrinalmrinal2 @sameerdharmadhikari @aastadkale #ShushrutMankani @rishi_saxena_official @ajinkya_nanaware @s.bhilare7 #SurajPilley @mahesh_ghag13 #AmirTalekar #JayendraMore #MadhaviNimkar @prajakta_official @rajanbhise #RohanMankani @daveruchi @nikhilslanjekar @pratikredij #VaibhavGalandePatil #SubhodPatil @aman_alkunte #BabbuKhanna #AmolGoley @sanika_gadgil #PournimaOak

A post shared by Almonds Creations (@almondscreations) on

अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे व ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 11:13 am

Web Title: jangjauhar marathi movie on bajiprabhu poster released ssv 92
Next Stories
1 अंकिताची तब्येत बिघडताच सुशांतच्या जीवाची झाली होती घालमेल; थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल
2 अभिनेत्रीला करोनाचा संसर्ग; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म
3 राधिका आपटेचा हॉलिवूडप्रवास; ‘अ कॉल टू स्पाय’साठी करते दिवसरात्र मेहनत
Just Now!
X