दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघींनी गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं. जान्हवीच्या ‘धडक’ आणि साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसादही दिला. या चित्रपटानंतर पहिल्यांदाच या दोघींनी स्टेज परफॉर्मन्स दिला आहे. नुकत्याच झालेल्या उमंग या कार्यक्रमामध्ये या दोघी स्टेजवर थिरकल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या उमंग या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक कलाकारांनी स्टेज परफॉर्मन्स दिले. मात्र जान्हवी आणि साराच्या डान्सने साऱ्यांच्या त्यांच्यावर नजरा खिळवून ठेवल्या होत्या.
जान्हवीने पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये लावणी नृत्य सादर केल्याचं पाहायला मिळालं. जान्हवीने ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं. जान्हवीच्या या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
#janhvikapoor shows off her Lavani skills at Umang 2019 #umang2019 #janhvikapoor #lavanidance
तर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने ‘आखं मारे’ या गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साराच्या डान्सचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा ‘स्वीटहार्ट’ आणि नंतर ‘आखं मारे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
#SaraAliKhan debuts at #Umang2019 too pic.twitter.com/LdBFNOUEaf
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 27, 2019
दरम्यान, लावणी सादर करताना जान्हवीने क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. तिचा हा लूक इंडो-वेस्टन प्रकारातला होता. थ्रेड अॅम्ब्रॉयडरी केलेल्या या ड्रेसवर लाल रंगाची ओढणीही होती. त्यामुळे जान्हवीचा लूक खुलून दिसत होता. हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधील होता. तर साराने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 1:26 pm