News Flash

दीपिका, कार्तिकच्या या मौल्यवान गोष्टींवर जान्हवीचा डोळा! काय आहे सत्य?

जान्हवीने का दिला होता 'त्या' मुलाला नकार?

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या करिअरला सुरुवात होऊन फारसा काळ लोटला नसला तरी जान्हवीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. निखळ सौदर्य आणि अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

नुकताच जान्हवीचा ‘रुही’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. जान्हवीने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत काही मजेशीर प्रश्नावर हटके उत्तर दिली आहे. रॅपीड फायरमधील एका प्रश्नावर जान्हवीने “कार्तिक आर्यनच्या मेंदूची मी चोरी करीन , कारण मला वाटतं तो खूप स्मार्ट आहे.” असं उत्तर दिलंय. त्याचसोबत दीपिका पादूकोनचं सौदर्य मला हवंय असं जान्हवी म्हणाली. कारण दीपिकाचं सौदर्य अप्रतिम असल्याचं जान्हवीला वाटतं.

याचसोबत जान्हवीने तिच्या आयुष्यातील काही मजेशीर आठवणी या मुलाखतीत शेअर केल्या. प्रपोज करणाऱ्या एका मुलाला जाव्हवीने कसा नकार दिला हे तिने सांगितलं आहे. “मी एका मुलाला नाही म्हंटलं. माझी परीक्षा जवळ आलीय आणि मला आभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय असं सांगत मी त्या मुलाला नकार दिला. पण खास बात म्हणजे मी ती परीक्षा दिलीच नाही. मी फिरायला गेले आणि परीक्षेबद्दल विसरुनच गेले.” असा एक विनोदी प्रसंग घडल्याचं तिने सांगितलं.

त्यातसोबत तिने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. “जर मला कुणी छान खाण्यासाठी दिलं आणि चांगले विनोद केले तर मी 10 सेकंदात इम्पेस होईल.” असं ती म्हणाली.

जान्हवी कपूरचा ‘रुही’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालतोय. राजकुमार राव आणि वरुण शर्माचा कॉमेडी अंदाज या सिनेमात पाहायला मिळतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:52 pm

Web Title: janhavi kapoor wants to steal kartik aryans brain and dipeeka padukons beauty kpw 89
Next Stories
1 “जेव्हा मी काडीपैलवान होते..,” प्राजक्ता माळीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा
2 ‘मुलगी झाली हो’मधील माऊ आणि सिद्धांतचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 ‘अनुष्काकडून काही शिक’, बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांचा सल्ला
Just Now!
X