01 October 2020

News Flash

काम मिळवण्यासाठी जान्हवी करतेय अभिनेत्याला विनवणी

"माझ्याकडे पासपोर्ट आहे चित्रपटात काम दे"

करोना आउटब्रेकमुळे सर्व जण सध्या घरीच आहेत. अनेक लोक टीव्ही, सोशल मीडिया किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज पाहून वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यन याने एक गंमतीशीर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोने सर्वसामान्य नेटकऱ्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

काय आहे या फोटोमध्ये?

कार्तिकने फेस अॅपच्या मदतीने एडिट केलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक वृद्ध दिसत आहे. “चला बागबान चित्रपटाचा रिमेक करुया. हिरोईनच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरु आहे. तुम्ही आपल्या एन्ट्री पाठवा.” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली होती.

 

View this post on Instagram

 

Ageing Gracefully in Lockdown Lets Remake Baghban now Casting for Heroines role Pls send in your entries

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मुलींनी तर हिरोईनच्या भूमिकेसाठी स्वत:चे नाव देखील सुचवले आहे. गंमतीशीर बाब म्हणजे या फोटोवर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जान्हवी म्हणाली, “सर मी माझी एन्ट्री पाठवत आहे. या भूमिकेसाठी मी अगदी योग्य असल्याची मला खात्री आहे. मला कथ्थक करता येतं. तसंच माझ्याकडे अधिकृत पासपोर्ट देखील आहे.” अशी गंमतीशीर प्रतिक्रिया तिने दिली. तसंच “सर माझ्या प्रोफाईलचा देखील विचार करा” अशी कॉमेंट भूमीने केली आहे.

‘बागबान’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तसंच या चित्रपटात सलमान खान देखील होता. वृद्ध आई-वडिलांच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 4:07 pm

Web Title: janhvi kapoor bhumi pednekar audition for kartik aaryans baghban remake mppg 94
Next Stories
1 Lockdown : माधुरीची डान्स क्लासला हजेरी; लढवली भन्नाट शक्कल
2 शाहरूख खानने जिंकलं मन, विलगीकरणासाठी ऑफिसची इमारत देण्याची ऑफर
3 शाहरुखचा आदर्श ठरला ‘लाख’मोलाचा; फॅन पेजने केली आर्थिक मदत
Just Now!
X