News Flash

जान्हवी कपूरने जुहूमध्ये घेतलं नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!

जुहूमधल्या इमारतीत हे नवीन घर तीन मजल्यांवर पसरलेले आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूरने मुंबईत नवीन घर विकत घेतलं आहे. ‘स्क्वेअर फिट इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, जुहूमधल्या इमारतीत हे नवीन घर तीन मजल्यांवर पसरलेले आहे. गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी जान्हवीने हा करार केला.

३,४५६ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे घर जान्हवीने तब्बल ३९ कोटींना विकत घेतल्याचं समजतंय. तसंच स्टँप ड्युटीसाठी तिने ७८ लाख रुपये भरले आहेत. २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. झोया अख्तर दिग्दर्शित ‘घोस्ट स्टोरीज’मध्येही ती झळकली. सध्या तिच्या हातात ‘दोस्ताना २’ आणि ‘रुही अफ्जाना’ ही दोन चित्रपटं आहेत. जान्हवी सध्या वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर यांच्यासोबत लोखंडवाला या ठिकाणी राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आणखी वाचा- आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी

जान्हवीच्या आधी आलिया भट्ट आणि हृतिक रोशननेही मुंबईत नवीन घर विकत घेतलं. आलियाने रणबीर कपूर राहत असलेल्या इमारतीतंच घर विकत घेतलं. तर हृतिकने जुहूमधल्या पेंटहाऊससाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च केल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 9:56 am

Web Title: janhvi kapoor buys new house in juhu worth rs 39 crore spread across three floors ssv 92
Next Stories
1 ’खिसा’वर होतोय कौतुकाचा वर्षाव; मराठी कलाविश्वातील दिग्गज म्हणतात…
2 दीपिकाने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सुरु झाली दीप-वीरची लव्हस्टोरी
3 अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X