बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत असते. जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या फोटोत जान्हवीने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

सध्या जान्हवी तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने परिधान केलेला स्ट्रॅपलेस सिल्क नियॉन ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर Alexandros Pertsinidis यांनी डिझाइन केलेला आहे. त्याच्या ब्रॅंडचे नाव अॅलेक्स पेरी असे आहे. जान्हवीने परिधान केलेला हा ड्रेस Alexandros Pertsinidisच्या फॉल-विंटर २०२० कलेक्शनमधला आहे. या ड्रेसची खरी किंमत ही $3,800म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रूपये इतकी आहे. हा फोटो जान्हवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.  “रुही चित्रपटाच्या प्रमोशनचा पहिला दिवस,” अशा आशयाचे कॅप्शन जान्हवीने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एवढा महागडा ड्रेस जान्हवीने ‘रूही’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिधान केला होता. जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या या ड्रेसची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. जान्हवीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या या फोटोला ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जान्हवीचा ‘कारगिल गर्ल- गुंजन सक्सेना’ हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडला. आता तिचा ‘रूही’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणरा आहे. या चित्रपटात जान्हवीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.