21 September 2020

News Flash

जान्हवी कपूरने सांगितले स्टारकिड असण्याचे तोटे; म्हणाली…

जान्हवी सांगते, स्टारकिड असणं म्हणजे...

‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत झळकली असून तिच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीने या चित्रपटाविषयी चर्चा केली. सोबतच एक स्टारकिड असल्यामुळे कोणत्या गोष्टीचं नुकसान होतं हेदेखील सांगितलं.

“गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित चित्रपटात काम करण्याचा अनुभव छान होता. प्रत्येक गोष्ट करताना एक नवीन अनुभव मिळत होता. त्या ज्या पद्धतीने आयुष्य जगल्या आणि त्यांनी जे कार्य केलं हे खरंच इतरांपेक्षा वेगळं आहे. आजूबाजुला कितीही नकारात्मक वातावरण असलं तरीदेखील आपल्याला आपलं काम करायचं आहे हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं”, असं जान्हवी म्हणाली. याचवेळी ‘एक स्टारकिड म्हणून कलाविश्वात तुझ्यासोबत कसं वातावरण असतं?’ असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला होता. त्यावर नुकसान अधिक आहे असं उत्तर दिलं.

 

View this post on Instagram

 

☺️ Gunju

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

“प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. यापैकी मी कायम सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देते. एक स्टारकिड असल्याचा जसा फायदा आहे, तसे तोटेदेखील आहेत. काम करताना अनेकदा दडपण असतं, लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं, सतत लोकांचं लक्ष वेधलेलं असतं. पण सध्या पाहायला गेलं तर आता कुठे मी कॅमेरासमोर खऱ्या अर्थाने येऊ लागले आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. प्रत्येक गोष्टीत एक पडती बाजू असतेच. मात्र मला नकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्याचं नाहीये”, असं जान्हवीने सांगितलं.

दरम्यान, गुंजन सक्सेना या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, अंगद बेदी अणि विनीत कुमार सिंह यांनी स्क्रीन शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 2:38 pm

Web Title: janhvi kapoor reveals drawbacks of being a star kid ssj 93
Next Stories
1 संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, पत्नी मान्यता म्हणाली….
2 “..तर मी ‘सडक २’ विरोधात कायदेशीर कारवाई करेन”; अभिनेत्याचा इशारा
3 रियाचा फोन नंबर समजून नवी मुंबईतील तरुणाला धमकीचे कॉल आणि मेसेजेस
Just Now!
X